महाराष्ट्रतल्या जनतेला लवकरच मिळणार उकाड्यापासून पासून दिलासा ; ‘या’ तारखेला येणार मान्सून ! 

spot_img

महाराष्ट्रतल्या जनतेला लवकरच मिळणार उकाड्यापासून दिलासा ; ‘या’ तारखेला येणार मान्सून ! 

मान्सून आगमनाबाबत एक मोठी माहिती भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या तज्ञांनी मान्सूनच्या आगमनाची थेट तारीख सांगितली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे.

भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 किंवा 11 जून रोजी मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की माणसांचे आगमन नेहमी सात जूनच्या सुमारास होते.

यंदा मान्सून आगमन पाच-सहा दिवस उशिरा होत आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण यंदा समाधानकारक मान्सून राहणार आहे. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 96% पर्यंत मान्सून सामान्य मान्सून राहणार आहे.

राज्यात जवळपास 87 मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता यंदाच्या मान्सून काळात राहणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढे याचा प्रवास कसा राहील याबाबत अद्याप अंदाज लावता येणार नसल्याचे चित्र आहे.

मात्र या महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत देखील भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून सविस्तर माहिती जारी केली जाणार आहे. एकंदरीत, चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात मान्सूनची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी नियोजनाची तयारी देखील युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. जमिनीची पूर्व मशागत करण्याचे काम सध्या शेतकरी बांधव करत असून आता याला अंतिम रूप देण्यासाठी युद्ध पातळीवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :