मविआ सरकारच्या काळातल्या कोविडच्या अनियमिततेसह भ्रष्टाचाराच्या चौकशीला लागलं ब्रेक !

spot_img

मविआ सरकारच्या काळातल्या कोविडच्या अनियमिततेसह भ्रष्टाचाराच्या चौकशीला लागलं ब्रेक !

 

आरोग्य खात्यातून बदली करण्यात आलेले आणि 16 वर्षांत 25 वेळा बदली करण्यात आलेले आणि अद्यापही नियुक्ती न मिळालेले कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंडे यांनी यापूर्वीच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात कोविडच्या माध्यमातून जी अनियमितता आणि जो कथित भ्रष्टाचार झाला, त्याची निर्भिड चौकशी मुंडे हे करणार होते.

 

सातत्यानं बदली करण्यात आल्यामुळे मुंडे यांना व्यवस्थित काम करता आलं नाही, कामाचा ठसा त्यांना उमटवता आला नाही. मुंडे यांची सातत्यानं बदली झाल्यानं जनतेचं अपरिमित नुकसान झालं. परिणामी जनतेला न्याय मिळाला नाही, भ्रष्टाचाराची चौकशी रखडली आहे.

 

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि कोविडच्या महामारीनं डोकं वर काढलं. अर्थात ही महामारी मानवनिर्मिती होती, की खरोखरच होती, हा संशोधनाचा विषय असला तरी या कोविडच्या चालून आलेल्या संधीचा सर्वच नाही मात्र अनेक खासगी डाॅक्टरांनी चांगलाच गैरफायदा घेतला.

 

कोविडच्या रुग्णांना रेमडिसिविर देताना त्या इंजेक्शनची खरी किंमत कोणालाच माहित होऊ न देता त्या इंजेक्शन्ससाठी लाखो रुपये उकळले गेले. ज्यांच्याकडे बक्कळ असा पैसा होता, त्यांना काही खासगी डाॅक्टरांनी प्रचंड लुटलं. यात अनेक डाक्टरांवरचं कर्ज ‘निल’ Nill होऊन अतिरिक्त असा अनेक पोती भरुन पैसा या डाॅक्टरांकडे आला.

 

या आर्थिक लुटीत सरकारी डाॅक्टरही मागे राहिले नाहीत. कोविडच्या पहिल्या लाटेत सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी झाली होती. रुग्णांना देण्यासाठी रेमडिसिविर इंजेक्शनसह आॅक्सिजन सिलेंडर्स आणि पीपीई किट्सच्या खरेदीमध्ये सरकारी दवाखान्यांत बोगस बिलं काढण्यात आली.

 

या सर्व गैरव्यवहारांची चौकशी आरोग्य खात्याचे आयुक्त या नात्यानं मुंडे हे करणार होते. मात्र यासाठी भ्रष्ट अशी डाॅक्टर लाॅबी कामाला लागली. या महाशयांनी आरोग्यमंत्र्यांची दिशाभूल करत मुंडे यांच्या बदलीसाठी एकजूट केली आणि मुंडे यांची बदली झाली.

 

आरोग्य विभागातून बदली झाल्यामुळे मुंडेंचा नाही, पण सामान्य जनतेचा खूप मोठा तोटा झाला. कोविडच्या काळात झालेल्या आर्थिक लुटमारीची चौकशी होऊन अनेक खाजगी डाॅक्टर जेलमध्ये गेले असते, सरकारी डाॅक्टरांविरुध्द निलंबन कारवाई करण्यात आली असती. परंतू तत्पूर्वीच मुंडे यांची बदली करण्यात आली.

 

‘या’ पापात भाजपाचाही मोठ्ठा वाटा !

 

कोविड महामारीची भिती दाखवून अनेक निरपराध लोकांचा बळी घेण्याचं पाप यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं. मात्र या पापाची शिंदे – भाजप सरकार नि:पक्षपातीपणे चौकशी करील, अशी महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षा होती. मात्र चौकशी करणार्‍या शिस्तप्रिय मुंडेंची बदली करुन सध्याच्या सरकारनं यापूर्वीच्या सरकारनं केलेल्या पापात मोठ्ठा वाटा घेतल्याचं यानिमित्तानं बोललं जातंय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :