मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी…!
निलंबित मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी;
अहिल्यानगर : महानगर पालिकेचे अधिकारी यशवंत डांगे आयुक्त, विजयकुमार मुढे उपायुक्त, विशाल पवार- मुख्य लेखा परिक्षक, मेहेर लहारे-सहाय्यक आयुक्त, डॉ. सतिष राजुरकर-प्रभारी वैदयकिय आरोग्य अधिकारी, यांच्या विरुध्द बी एन एस चे कलम ३१८ (४), ३३६(१), ३३६(२), ३३६(३), ३३६(४),३३५, ३३८, ३४०(२), ३५६ (१) ६१ (२) ३ (५) तसेच अनुसुचीत जाती / अनुसुचीत जमाती (अत्याचारास प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३ (१), (आर) (एस) अन्वये गुन्हा दाखल करण्याची मांगणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे निलंबित वैदकिय अधिकारी अनिल बोरगे यांनी निवेदनाद्वारे केली.
ते पुढे निवेदनात म्हणाले की, अहिल्यानगर महानगर पालिका येथे वैदयकिय आरोग्य अधिकारी म्हणुन दिनांक ०९/०३/२०१० पासून कार्यरत आहे. त्या करीता मा. नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक ०९/०३/२०१० व दिनांक २०/०४/२०१६ रोजीचे शासन निर्णया प्रमाणे माझी सदर पदावर नियुक्ती झालेली आहे. मी सदर पदावर अत्यंत इमाने इतबारे संपुर्ण माझे कौशल्य वापरुन माझ्या नियुक्ती प्रमाणे पुर्ण निष्ठेने माझे कर्तव्य पार पाडीत आहे.
परंतु म.न.पा आयुक्त व इतरांनी माझ्या विरोधात मनात राग ठेवून केवळ मी अनुसुचीत जातीचा आहे आणि सार्वजनीक आरोग्य विभागाच्या राज्य अधिकाऱ्यांच्या रँकींग मध्ये मी या पुर्वीच २६ व्या क्रमांका वरुन १६ व्या क्रमांकावर आलेलो आहे. त्या करीता मी अनेक कष्ट करुन सेवा देवून सदरची श्रेणी प्राप्त केलेली आहे. याची जाणीव व कौतुक न करता व माझ्या बद्दल वरील प्रमाणे मी केवळ अनुसुचीत जातीचा असल्याचा मनात राग धरुन मला आयुक्त यशवंत डांगे यांनी त्यांचे पत्र जा.क्र. १०७ दिनांक ०७/०१/२०२५ नुसार विनाकारण माझ्या विरुध्द कोणतेही सबळ पुरावे नसतांना व तसेच आवश्यक त्या नियमा प्रमाणे कारवाई न करता मन मर्जीने मला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
त्याबाबत मी तारीख ०७/०१/२०२५व ०९/०१/२०२५ रोजी आयुक्त डांगे यांनी मला माझ्या पदावर नियमा प्रमाणे काम करुन देण्याबाबत विनंती करुनही मला त्यांनी माझ्या पदावर काम करु दिले नाही व मला विनाकारण बेकायदेशिर रित्या सक्तीच्या रजेवर जाण्यास भाग पाडलेले आहे. सदरचे सक्तीच्या रजे बाबतचा आदेश रद्द करण्यासाठी मी मा. प्रधान सचिव नगर विकास विभाग यांना लेखी अर्ज केलेला आहे. त्याबाबत मा. प्रधान सचिव यांनी अहिल्यानगर महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून दिनांक ३०/०१/२०२५ रोजीच्या पत्राने लेखी खुलाशाची मागणी केलेली आहे. असे असतांना सदर आयुक्त यांनी आवश्यक ते कायदेशिर व नियमा प्रमाणे कार्यवाही करण्या ऐवजी माझ्या विरुध्द वैयक्तीक व्देशातुन दिनांक १६/०१/२०२५ रोजीच्या जा क्र. २६४ नुसार एक बेकायदेशिर समिती नेमली.
त्यामध्ये वर विषयात नमुद केलेल्या इसमांचा सामावेश केलेला आहे. सदरचे सर्व इसम हे आयुक्त डांगे यांच्या मर्जीतील व ते सांगतील त्या प्रमाणे काम करणारे आहेत. त्यानंतर तारीख ३०/०१/२०२५ रोजीच्या माझ्या पत्रा नुसार त्याबाबत मी मा. प्रधान सचिव यांच्याकडे वरील सर्व बाबींची व आयुक्ताच्या वर्तनाची लेखी तक्रार मी पाठविलेली आहे व त्याबाबतही आयुक्ताकडून मा प्रधान सचिव यांनी खुलाशाची मागणी केलेली आहे. सदर आयुक्त डांगे यांनी मा. प्रधान सचिव यांचे पत्राला उत्तर देण्या ऐवजी विनाकारण त्याचा मनात राग धरुन त्यांचे दिनांक ०४/०२/२०२५ रोजीचे जा. क्र. ४९३ नुसार मला आयुक्त डांगे यांनी कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. त्यामुळे मी दिनांक ०५/०२/२०२५ रोजी महानगर पालिका आयुक्त यांच्याकडे अर्ज करुन कळविले की, त्यांनी गठीत गेलेल्या चौकशी समितीने नियमा प्रमाणे कार्यवाही न करता तसेच योग्य प्रोटोकॉल न पाळता आणि नैसर्गीक न्याय तत्वाचे पायमल्ली करुन त्यांचा अहवाल चुकीचा व अर्धवट असा दिलेला आहे.
तो माझ्या सेवेसाठी चुकीचा व हानीकारक आहे. तसेच माझे बाबत दिलेल्या चुकीच्या अहवालास मला म्हणणे सादर करण्याकामी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याची विनंती करुनही मला जाणीव पुर्वक कागदपत्र उपलब्ध करुन दिली नाही त्यामुळे शेवटी मी दिनांक ११/०२/२०२५ रोजी त्याबाबत मी मा. उपायुक्त विजयकुमार मुंढे यांना पत्र दिले. सदर कागदपत्रांसाठी महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेले उपायुक्त आणि त्यांना काही कागदपत्र पहाण्यासाठी मला उपलब्ध करुन देण्याची मी विनंती करुन सदर कागदपत्रांच्या प्रतीची मागणी केली. तसेच दरम्यानच्या काळांत मी वर नमुद केल्या प्रमाणे २६ व्या क्रमांकावरुन १६ व्या क्रमांकाच्या क्रमवारीतील प्रगतीमुळे मला माझ्या पदावर पुर्नस्थापीत करण्यासाठी दिनांक ०६/०२/२०२५ व १०/०२/२०२५ रोजी अर्ज दिले होते परंतु मला वर नमुद इसमानी माझ्या जागेवर पुर्नस्थापीत करण्याऐवजी तसेच माझ्या अर्जाचा विचार न करता कोणतीही विभागीय योग्य अशी चौकशी न करता तसेच महाराष्ट्र महानगर पालिकेच्या अधिनियमानुसार व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार कोणतेही विशेष लेखा परिक्षण न करता केवळ माझ्या व माझ्या अनुसुचीत जाती बद्दल मनात राग ठेवून मला वर चांगल्या योग्य पदावर काम करण्याची संधी देण्याचे सदर इसमांनी जाणीव पुर्वक व्देशमुलक बुध्दीने टाळून प्रभारी वैदयकिय अधिकारी डॉ सतिष राजुकरकर यांच्यासह म.न.पा आयुक्त यशवंत डांगे यांनी जाणुन बुजुन पुर्वग्रहदुषीत हेतुने कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथें खोटा फौजदारी गुन्हा इं पी को. कलम ४०९, ४२० सह ३४ अन्वये केवळ त्यांच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन दाखल केला. सदर इसम एवढ्यावरच थांबले नाहीतर सदर गुन्हयाची चौकशी करुन माझे निर्दोषत्व सिध्द करण्याची संधी न देता संबंधीतांनी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणुन मला बेकायदेशिर रित्या अटक करुन मला अनेक विविध प्रकारे त्रास दिलेला आहे.
सदर इसमांनी माझी सामाजीक प्रतिमा खराब करण्याच्या दुष्ट हेतुने तसेच माझे कौटुंबीक जीवन बिघडविण्याच्या गैरहेतुने तसेच माझे सामाजीक व नोकरीचे भवितव्य कायमचे संपविण्याच्या कुटील दुष्ट हेतुने तसेच माझे जीवीतास धोका निर्माण करणारे तसेच मला मानसिक शारीरीक आर्थिक हानी पोहचेल या वाईट हेतुने माझ्या विरुध्द खोटा, चुकीचा व बनावट गुन्हा दाखल करुन मला अनेक दिवस अटक करुन जेलमध्ये ठेवण्यास सदर इसमांनी भाग पाडले आहे, त्या करीता सदर इसमांनी मिळून कट कारस्थान करुन अत्यंत योजनाबध्द रितीने सदरचे कृत्य त्यांचे पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करुन केलेले आहे.
सदर गुन्हा रजि नंबर ८८/२०२५ मधील फिर्यादी सतिष राजुरकर यांनी मी अनुसुचीत जाती प्रवर्ग म्हणजेच हिंदु मांग असल्याने मला अपमानीत करुन माझा छळ करण्यासाठी माझे पद काढून घेवून मला जाणुन बजुन आयुक्त यशवंत डांगे यांचे आदेशावरुन त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी अनुसुचीत जातीचा मी असल्याचे माहिती असतांनाही माझ्यावर विनाकारण चुकीची व खोटी कारवाई वरील इसमांनी मला कार्यालयात अपमानीत करण्या करीता केलेली आहे. तसेच मी त्यांच्या विरुध्द कोणतीही कारवाई करु नये म्हणुन देखील सदर इसमांनी माझ्यावर वेगवेगळ्या पध्दतीने दबाव आणुन मला चुकीच्या व खोट्या नोटीसा दिलेल्या आहेत. सदर इसम यशवंत डांगे यांनी मला अनेक वेळा कार्यालयात व कार्यालयाचे बाहेर सार्वजनीक ठिकाणी जनते समोर तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे समोर माझ्या जाती बाबत उल्लेख करुन तु खालचे जातीचा असून तुला उच्च पदावर काम करण्याचा अधिकार नाही असे म्हणुन अपमानीत केलेले आहे.
तसेच मला तुझा कार्यक्रमच करतो, मला राजकिय पाठबळ असून तु माझे काहीही करु शकत नाही अशा धमक्या देखील वेळोवेळी दिलेल्या आहेत. याबाबत मी माझ्या पत्नी सुरेखा बोरगे बरोबर वेळोवेळी चर्चा देखील केली होती परतु उदर निर्वाहासाठी नोकरीची आवश्यकता असल्याने मी त्यावेळी भितीपोटी सदर इसमांची तक्रार कोठेही केली नव्हती. सदर डॉ सतिष राजुरकर, आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त विजय मुंढे, मुख्य लेखापरिक्षक विशाल पवार, व सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे यांनी मिळून संगनमताने कट कारस्थान करुन बेकायदेशिर रित्या मला सक्तीचे रजेवर पाठवून खोटे कागदपत्र तयार करुन माझ्या विरुध्द खोटे पुरावे तयार करुन तसेच त्या करीता त्यांच्या पदाचा गैरवापर करुन खोटा गुन्हा रजि नंबर ८८/२०२५ चा ता १२/०२/२०२५ रोजी दाखल केला होता. सदर गुन्हा दाखल करुन मला अटक करण्या करीता वरील इसमांनी राजकिय दबाव निर्माण करुन मला बेकायदेशिर रित्या अटक करण्यास भाग पाडले.
त्यामुळे मला ता १२/०२/२०२५ ते १८/०२/२०२५ पर्यंत जेलमध्ये राहावे लागले आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण वरील इसमांनी बेकायदेशिर हिरावून घेतले आहे, तसेच कोणतेही सबळ पुरावे नसतांना मला अटक केल्यामुळे माझी समाजात, नातेवाईकांत बदनामी झाली असून मला विनाकारण जेलमध्ये राहावे लागले आहे. त्यामुळे माझं स्वतंत्ररित्या जगण्याच्या अधिकारावर देखील गदा आणलेली आहे. सदर इसमांनी वरील कृत्य केवळ अभिलाष बुध्दीने मी करत असलेला विकास त्यांना न पहावल्याने मला सदर पदावरुन हटविण्या करीता वरील कृत्य केलेले आहे. माझ्या विश्वासाचा व माझ्या कर्तव्याचा कोणताही विचार न करता माझा वरील इसमांनी माझी घोर फसवणूक केली आहे व विश्वासघात करुन मला बेकायदेशिर अटक केलेली आहे.
त्यामुळे मला मोठा मानसिक, शारीरीक व आर्थिक असा धक्का बसला असून माझ्या मनावर त्याचा मोठा आघात झालेला आहे. त्यामुळे माझे मोठे सामाजीक बदनामी होवून मोठी हानी झालेली आहे. त्याबाबत वरील इसमांनी माझ्या विरुध्द खोट्या बातम्या देखील अनेक माध्यमां मार्फत प्रसिध्द करुन त्याव्दारे देखील माझी समाजात, नातेवाईकांत मित्रमंडळी व सहाकार्यांमध्ये बदनामी करुन माझी गेल्या २५ वर्षाचे काळातील सर्व पत धुळीस मिळविलेली आहे. मला अटक झाल्याने माझी वयोवृध्द आई, पत्नी मुले यांचे मनावर देखील मोठा आघात होवुन त्यांना देखील अत्यंतीक मानसिक शारीरीक अशा वेदनांना सामोरे जावे लागले आहे.
माझ्या मुलांच्या शिक्षणावर देखील त्याचा मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. सदरचे कृत्य सदर इसमांनी अत्यंत विचारपुर्वक एकमिलाफी होवून संगमताने कायदयाचा व अधिकाराचा दुरुपयोग करुन कायदा हातात घेवून केवळ मी मागासवर्गीय असल्याचा मनात राग धरुन मला उच्च पदावर माझी नियुक्ती होवू नये या दुष्ट हेतुने सदरचे बेकायदेशिर कृत्ये केलेले आहेत. त्या करीता सदरील इसमांनी कट कारस्थान रचुन विचार पुर्वक सदरचे कृत्य केलेले आहे. त्यामुळे वरील सर्व इसम हे अनुसुचीत जाती /अनुसुचीत जमाती (अत्याचारास प्रतिबंध अधनियम १९८९) मधील तरतुदी नुसार अत्यंत हिन व गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे.
तसेच सदर इसमांनी त्या सोबत एन एस चे कलम ३१८(४), ३३६(१), ३३६(२), ३३६(३), ३३६(४),३३५, ३३८, ३४० (२), ३५६(१) ६१(२) ३(५) नुसार देखील अत्यंत किळसवाने व बेकायदेशिरकृत्य केले असल्याने त्या प्रमाणे देखील सदर इसमांचे विरुध्द तातडीने गुन्हा दाखल होवून कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.
वरील इसमांनी माझ्या विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांचेकडील गुन्हा रजि नंबर ८८/२०२५ भा द वि कलम ४०९, ४२०, सह ३४ प्रमाणे दाखल केलेल्या गुन्हयात सदर पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी यांनी अत्यंत योग्य पध्दतीने सर्व तपास पूर्ण करुन त्यामधील उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांकडे त्याबाबत संपुर्णपणे सबळ माहिती पाठविली व त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांनी त्यांच्याकडील जा क्र, शवी/गुन्हे/१३९३/२०२५ दिनांक २९/०३/२०२५ अन्वये पत्रान्वये माझ्या विरुध्द कोंर्टात दोषारोपपत्र पाठविणे इतपत पुरावा नसल्याने मला बी एन एस एचे कलम १८९ प्रमाणे सोडून दिलेले आहे. यावरुन वरील सर्व इसमांनी कट कारस्थान करुन केवळ मी मागासवर्गीय जातीचा असल्याने मला बदनाम करुन माझी नोकरी घालविण्याच्या दुष्ट हेतुने माझ्या विरुध्द खोटे कागदपत्रे तयार करणे, त्या करीता कट करणे, सदर कट करण्यासाठी समिती गठीत करणे, त्यामध्ये मर्जीतील इसमांना सामिल करणे, त्या अनुशंगाने वेगवेगळे खोटे आदेश तयार करणे, सदर आदेशांवरुन खोटे लेखा परिक्षण करणे, खोटें हिशोब दाखवून कागदपत्रामध्ये हेराफेरी करणे, सरकारी अधिकारी म्हणजे पोलीस स्टेशनला खोटी माहिती देवून खोटी फिर्याद दाखल करुन पोलीसांची दिशाभुल करुन माझ्या विरुध्द खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडून त्या करीता राजकिय दबावाचा वापर करुन मला बेकायदेशिर रित्या अटक करुन मला १२/२/२०२५ ते १८/२/२०२५ पावेतो जेलमध्ये डांबून ठेवून माझी सामाजीक, आर्थिक, मानसिक, शारीरीक नैतीक पत नष्ट करुन तसेच एवढ्यावर न थांबता मला व माझ्या कुटुंबीयांना त्रास देण्याच्या गैरहेतुने अनेक माध्यमांचा गैरवापर करुन माझी सार्वजनीक व इतर ठिकाणी बदनामी केली, मला वेळोवेळी सार्वजनीक ठिकाणी खालचे जातीचा म्हणुन मला हिनवीले तसेच मला बेकायदेशिर अटक होवून जेलमध्ये राहवे लागल्याने मला सेवेतुन निलंबीत केलेले आहे,
अशा प्रकारे सदर इसमांनी सुरवाती पासून अत्यंत विचारपूर्वक नियोजनबध्द बेकायदेशिर कृत्य केलेले आहे, त्यामुळे सदर इसमांनी मोठा अक्षम्य असा गुन्हा केलेला आहे. त्यामुळे मला निलंबीत केल्याने माझ्या व माझ्या कुटुंबीयावर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे, त्यामुळे माझे व माझ्या कुटुंबीयाच्या दैनंदीन गरजा भागविणे अत्यंत दुष्प्रत झालेले आहे व मुलांचे शिक्षण व इतर गरजा भागविणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे वर नमुद आरोपींनी वरील प्रकारे अक्षम्य असा गुन्हा केलेला आहे. सबब मे. साहेबांना माझी नम्र विनंती की, वरील कृत्त्या बाबत वरील इसमांचे विरुध्द तातडीनें योग्य ती जास्तीत जास्त कडक कायदेशिर कारवाई करण्यांत यावी व मला न्याय मिळवून दयावा. अशी मागणी निलंबित मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.