भारताचा देशद्रोही दाऊदचं 67 व्या दुसरं लग्न ! भाच्यानंच दिली भारतीय तपास यंत्रणांना माहिती

spot_img

भारताचा देशद्रोही दाऊदचं 67 व्या दुसरं लग्न ! भाच्यानंच दिली भारतीय तपास यंत्रणांना माहिती

 

मुंबईत 1993 साली झालेल्या बाँबस्फोटाची दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानच्या कराचीतून सूत्र हलवली आणि त्या भारताचा देशद्रोही घोषित करण्यात आलं. या भारताच्या देशद्रोही आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असलेल्या दाऊदनं वयाच्या 67 व्या वर्षी दुसरं लग्न केलंय.

 

दाऊद इब्राहिमच्या या दुसर्‍या लग्नाची बातमी त्याचा भाचा म्हणजे हसीना पारकरचा मुलगा अली शाह यानंच भारतीय तपास यंत्रणांना दिलीय. दरम्यान, दाऊद अंथरुणाला खिळलाय, अशा ज्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या, त्या ‘डी गँग’नंच पेरल्या होत्या, हे आता समोर आलंय.

 

दाऊद इब्राहिमचं दुसरं लग्न पाकिस्तानातल्याच पठाण परिवारातल्या एका महिलेशी झालंय. मात्र या महिलेचं नाव काय, तिचे पाकिस्तान सरकारशी काही संबंध आहेत का, दाऊदचं हे दुसरं लग्न कधी झालं आणि या लग्नाला कोण कोण उपस्थित होतं, याची चौकशी करण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.

 

दाऊद इब्राहिमच्या पहिल्या पत्नीचं नाव महजबीन आहे. भारतातल्या तिच्या नातेवाईकांना प्रत्येक सणावाराला ती व्हाॅट्सॲप काॅल करत असते. महजबीनची आणि दाऊदची 2022 मध्ये भेट झाली होती आणि या भेटीतच दाऊदच्या दुसर्‍या लग्नाची बातमी आलीय.

 

 

दाऊद इब्राहिम पाकिस्तानात कुठं राहतो, त्या ठिकाणचा पत्ता दाऊदचा भाचा अली शाहनं भारतीय तपास यंत्रणांना दिलीय. या माहितीनुसार पाकिस्तानच्या कराचीमध्ये असलेल्या डिफेन्स एरियामध्ये गाजी अब्दुल्ला बाबाचा दर्गा आहे. या परिसरातच दाऊदचं घर असल्याचं त्याचा भाचा अली शाहनं सांगितलंय.

 

दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच आहे, हे या माहितीतून स्पष्ट झालंय. एका पोलीस कर्मचार्‍याचा मुलगा असलेला दाऊद आंतरराष्ट्रीय गुन्हेगार होईल, याची त्याच्या जन्मदात्या आईलाही कल्पना नसावी.

 

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातल्या मंदाकिनीला दाऊद इब्राहिमनं कधी टाकून दिलं, हे कोणालाच समजलं नाही. स्व. राज कपूर यांच्या या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या मंदाकिनीचा दाऊदनं केलेला गैरवापर आणि 1993 सालच्या बाँबस्फोटासह भारताशी देशद्रोह केल्यामुळे दाऊदला सध्याच्या सरकारनं जेरबंद करावी, अशी भारतवासियांची इच्छा आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :