बोगस ‘पीएचडी’तून PHD जगभरातल्या अनेकांची फसवणूक! या बोगस विद्यापिठाची पीएचडी घेणार्‍यांची चौकशी होईल का?

spot_img
बोगस ‘पीएचडी’तून PHD जगभरातल्या अनेकांची फसवणूक!
अहमदनगर जिल्ह्यातल्या काही पत्रकार PRESS आणि कीर्तनकारांनाही गंडवलंय !
या बोगस विद्यापिठाची पीएचडी घेणार्‍यांची चौकशी होईल का?

बाळासाहेब शेटे पाटील
[email protected]
MO. NO. 7028351747

युनिव्हर्सिटी ऑफ मॅकरिया Univesity Of Macriya या बोगस विद्यापिठाच्यावतीनं 16 आॅक्टोबर 2022 रोजी बोगस पीएचडी PHD पदव्या वाटपाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता. आता हे विद्यापीठ बोगस कसं, ते पाहू. स्प्राऊट्सच्या Spraut स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमला Spatial Investigetion Team एक धक्कादायक माहिती मिळाली, की महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतासह जगभरात बोगस आॅनररी पीएचडी पदव्या Bogus Onrary PHD Degree विकण्याचा धंदा सुरु आहे. विशेष म्हणजे युनिव्हर्सिटी आॅफ मॅकरिया हे विद्यापीठ जगाच्या पाठीवरच कुठंच अस्तित्वात नाही.

या बोगस विद्यापिठाच्या नावानं अहमदनगर जिल्ह्यातल्या काही वरिष्ठ पत्रकार आणि वारकरी सांप्रदायातल्या काही किर्तनकारांनाही आर्थिकदृष्ट्या गंडवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या लुबाडणुकीमागे नक्की कोणाचा हात आहे, हे विद्यापीठ कोणतं, यातून किती जणांना किती रुपयांना गंडवण्यात आलंय, याची उच्चस्तरीय चौकशी होईल का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.

मुंबईतल्या भायखळा परिसरात असलेल्या एका दैनिकात दि. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान याविषयीचं सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आलंय. यामध्ये म्हटलंय, की बोगस पीएचडीच्या पदव्या मिळवून देण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांचा वापर केला जात आहे. युनिव्हर्सिटी आॅफ मॅकरिया या नावाचं विद्यापीठ रशियात असल्याचं सांगितलं गेलंय.

प्रत्यक्षात चौकशीअंती असं समजलं, की रशियामध्ये या विद्यापिठाच्या नावाखाली भलतंच विद्यापीठ सुरु आहे. या विद्यापिठानं देशाची राजधानी नवीदिल्लीच्या इंडिया हॅबिटेट सेंटर India Habotet Center इथं 16 आॅक्टोबर 2022 रोजी बोगस पीएचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी मध्यप्रदेशचे निवृत्त न्यायाधिश अमन मलिक Aman Malik, अॅडव्होटकेट रोहित पांडे Rohit Pande हे व्यासपिठावर उपस्थित होते.

मलिक आणि पांडे यांच्या हस्तेही यावेळी काही जणांना बोगस पीएचडीचं वाटप करण्यात आलं. यातला पांडे हा सुप्रिम कोर्टाच्या Suprim Coart बार असोसिएशनचा Bar Asosiation सहसचिव Co – Secretary असंही स्वत:बद्दल सांगतो आणि खुले आम बोगस पीएचडी विकतो. त्यामुळे पांडेच्या वकीलीची सनद रद्द करण्याची मागणी होत आहे.

मध्यप्रदेशच्या कौटिल्य अकॅडमीचे Kautilya श्रीधांत जोशी Akadamy Shridhant Joshi यांच्यासह अनेकांनी या बोगस पीएचडीचा लाभ घेतलेला आहे. दरम्यान, यासंदर्भात युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे University Grand Commition चेअरमन Chairman एम. जगादेश कुमार M Jagadesh Kumar यांच्याकडे स्प्राऊट्स यांच्याकडे करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त रशियाच्या नवीदिल्लीतल्या एम्बसी आणि रशियाच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात येऊन या आर्थिक लुबाडणुकीसंदर्भात सातत्यानं पाठपुरावा करण्यात येणार आहे. बोगस आॅनररी पीएचडी वाटप करण्यासाठी मोठमोठ्या पंचतारांकित हाॅटेल्सचा सर्रास वापर करुन तिथल्या जेवणावळींसाठी लाखो रुपयांची उधळण केली जाते.

बोगस पीएचडी वाटप करणारे अनेक जण राजभवनात हा कार्यक्रम सातत्यानं आयोजित करत असतात. मध्यंतरी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अॅवाॅर्ड फिल्म फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रह्लाद दामोदर मोदी यांच्या हस्ते बोगस पीएचडी वाटल्या. स्प्राऊट्सनेच याची भांडेफोड केली होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियमबाह्य पध्दतीनं लादलेले चिटणीस उल्हास मुणगेकर हे या टोळीत सामील आहेत. त्यामुळे या लोकांना असल्या कार्यक्रमांसाठी राजभवनची दारे सदासर्वदा उघडी असतात.

बोगस पीएचडीचे लाभार्थी असलेले नगरचे ‘ते’ पत्रकार आणि कीर्तनकार कोण ?

सुप्रिम कोर्टाच्या बार असोसिएशनचा सहसचिव असल्याचं सांगणारा रोहित पांडे हा अहमदनगर जिल्ह्यातल्या नक्की कोणकोणत्या पत्रकारांशी संपर्कात होता, त्याचबरोबर कोणकोणत्या कीर्तनकारांना या पांडेनं किती लाखांचा किंवा कोटी रुपयांचा चुना लावला, हे जाणून घेण्याची नगर जिल्ह्यातल्या जनतेला प्रचंड उत्सुकता आहे. एकूणच या पांडेच्या वशिल्यानं बोगस पीएचडीचा लाभ घेणारे नगर जिल्ह्यातले ‘ते’ कोण कोण पत्रकार आणि किर्तनकार आहेत, याची नगर जिल्ह्यात प्रचंड चर्चा ऐकायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :