बारावीच्या परीक्षेत महिमा दुसुंगे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण !

spot_img

बारावीच्या परीक्षेत महिमा दुसुंगे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण !

अहमदनगरच्या नगर तालुक्यात असलेल्या बुऱ्हानगरची महिमा दुसूंगे ही विद्यार्थिनी बारावीच्या परीक्षेत अहमदनगर शहराच्या पेमराज सारडा महाविद्यालयात प्रथम आली. तिला ९३ टक्के मार्क्स मिळाले. महिमाचा मोठा भाऊ आशिष, वडील अशोक आणि आई शिल्पा दुसूंगे यांचं महिमाला मोलाचं मार्गदर्शन मिळालं.

या यशाबद्दल सारडा महाविद्यालयातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. महिमाला पदवी शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यानंतर तिचा भाऊ आशिषच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातल्या करिअरची निवड करायची आहे. दरम्यान, या यशामध्ये सारडा महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका यांचा मोलाचा वाटा असल्याचं महिमाने सांगितलं.

महिमा ही महिला काँग्रेसच्या शिल्पा दुसूंगे आणि उद्योजक अशोक दुसूंगे यांची कन्या आहे. बारावीच्या परीक्षेत तिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचं अनेकांनी कौतूक करत भविष्यातल्या शैक्षणिक वाटचालीसाठी तिला अंत:करणापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :