बापरे ! 800 किलो सोने जप्त ! जाणून घ्या कोणत्या देशातून होते सोन्याची तस्करी?

spot_img

भारतात यापूर्वी सोन्याची तस्करी मध्य पूर्व भागातून व्हायची. मात्र सोन्याच्या तस्करीत आता म्यानमार Myanmar हा देश पुढे आलाय. सोने खरेदी करणारा ग्राहक या नात्यानं आपल्या देशाचा जगात चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. त्या तुलनेत आपल्या देशात सोन्याची तस्करीही मोठ्या प्रमाणात होते, हे अनेक स्त्रोतांच्या Sourses माध्यमातून स्पष्ट झालंय. आपल्या देशात वर्षभराच्या कालखंडात ठिकठिकाणी तब्बल 800 किलो सोनं जप्त करण्यात आलंय.

कोरोनाच्या काळात सोन्याची तस्करी वाढल्याचं दिसून आलंय. गेल्या वर्षी सोने तस्करीचे तब्बल 160 गुन्हे उघडकीला आले होते. त्यापैकी 405 . 35 कोटी रुपयांचे 833 . 07 किलो वजनाचं सोनं जप्त करण्यात आलंय. 2020 – 21 2021 – 22 मध्ये जप्त केलेलं सोनं हे बहुदा म्यानमारमधून आलं होतं.

देशात सोने तस्करीचा नवा फंडा आलाय. मागच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात जाणार्‍या विमानांची उड्डाणं बंद होती. लोकांना परदेशात जाण्याची परवानगी नव्हती. मात्र सोन्याची तस्करी कुरियरद्वारे झाली. अलीकडच्या काळात सोन्याची तस्करी हवाई मार्गानं न होता रस्ते आणि रेल्वे मार्गानं सोन्याची तस्करी वाढली, हे नाकारुन चालणार नाही.

भारत आणि म्यानमारच्या हद्दीवर लक्ष ठेवणं खूप अवघड असल्याचा गैरफायदा सोन्याचे तस्करी करणारे फायदे घेताहेत.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मणिपूरचा तमू – मोरेह – इंफाळ हा मार्ग आणि मिझोरामच्या जोखटवारमार्गे देशातल्या सोन्याची सर्वाधिक तस्करी होते, वास्तव समोर आलंय.

कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. आखाती देशामध्ये कमी पगारात नोकर्‍या करणारे परदेशी भारतीय बेरोजगार झाले आहेत. हवाई वाहतूक सुरु झाल्यानंतर अनेक लोक त्यांच्या मायदेशी परतले. मात्र या लोकांना सोन्याचं आमिष दाखवून सोन्याची तस्करी करण्यात आली.

या सोन्याची पेस्ट आणि पावडरच्या स्वरुपात तस्करी होते. यासंबंधी अनेक जण पकडले गेले. त्यांच्याकडून काही सोनं जप्त करण्यात आलं. सोन्याची तस्करी करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधले जाताहेत. युएईवरुन 16 जूलै 2021 रोजी नवीदिल्लीला आलेले चार पार्सल न्यू कुरियर टर्मिनलवर थांबविण्यात आले. त्या पार्सलमध्ये आॅटो आणि इतर पार्ट्स होते.

सखोल चौकशी अंती त्यातून 16 . 79 किलो म्हणजे 8 . 07 कोटी रुपयांचे सोने सापडले. हे सोनं वितळवून मशीनमध्ये ठेवण्यात आलं होतं. या कामात चीन, तैवान आणि दक्षिण कोरियाचे नागरिक सहभागी असल्याची माहिती मिळालीय. हे लोक हाँगकाँगमधून एअर कार्गो मार्गाने सोन्याची तस्करी करत होते. ते मशिनरी पार्ट्स म्हणून आयात केले जात होते आणि नंतर त्याचे बारमध्ये रूपांतर करून बाजारात वापरले जात होते.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :