बापरे ! पुण्यात पहिल्यांदाच आढळला ‘जेई’ पॉझिटिव्ह रुग्ण!

spot_img

मेंदूज्वराची बाधा झालेला पुणे शहरातला (Pune Health News) पहिला रुग्ण आढळून आला आहे. जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वर आजाराचा रुग्ण पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरीचा रहिवाशी आहे.

मागच्या महिन्यातल्या मंगळवारी (२९ नोव्हेंबर) त्याचा अहवाल एनआयव्हीमधून प्राप्त झाला होता. त्यानुसार तो ‘जेई’ पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालंय. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Pune Health News) रुग्णाच्या परिसरातील ताप आणि डासांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

दरम्यान, हा रुग्ण ज्या भागात सापडला आहे, त्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्या रुग्णाच्या घरातील तसेच आजूबाजूच्या घरातील 15 वर्षांखालील मुलांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत.

वडगाव शेरी परिसरात तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. दररोज 500 ते 600 लोकांचे सर्वेक्षण महापालिका करत आहे. या बालकाला नोव्हेंबरच्या सुरुवातीला ताप आणि डोकेदुखी सुरू झाली होती. नंतर ताप कमी न होता वाढला आणि त्याला तापेचा झटका आला. त्यामुळे त्याचा एक हात आणि पाय कमकुवत झाला.

सुरुवातीला त्याला खासगी दवाखान्यात दाखल केले होते. पण तिथून त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. या बालकावर दहा दिवस ससूनमध्ये उपचार सुरू होते. आता त्याच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली असून, सध्या त्याला ससूनमध्ये सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार दिले जात आहेत.

जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वर आजाराचा हा रुग्ण आहे. चार वर्षांच्या बालकाला या आजाराची बाधा झाली आहे. 3 नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयात बालरोग विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो वडगाव शेरीचा रहिवाशी आहे. मंगळवारी (२९ नोव्हेंबर) त्याचा अहवाल एनआयव्हीमधून प्राप्त झाला, त्यानुसार तो ‘जेई’ पॉझिटिव्ह आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :