नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा नोकरभरतीचा महाघोटाळा (Recruitment Scam) झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागात बोगस नियुक्तीपत्र (Duplicate Appointment Letter) देऊन अनेकांची फसवणूक (Cheating) केल्याचे उघड झाले आहे.
आरोग्य विभागातील (Health Department) आरोग्य सेवक पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन अनेकांची फसवणूक केल्याचे उघड (Recruitment Scam) झाल्यानंतर किनवट पोलीस ठाण्यात (Kinwat Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच वर्षांपूर्वी नांदेड येथे एमपीएससी घोटाळा उघडकीस आला होता. यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आरोग्य विभागाचा बनावट नोकरभरतीचा घोटाळा उघडकीस (Recruitment Scam) आला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पदवीधर असलेल्या सचिन जाधव (वय 34) या युवकाची फसवणूक झाली. यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे.
सचिन जाधव (Sachin Jadhav) याच्या वडिलांच्या परिचयाचे आनंदराव सोनकांबळे (Anandrao Sonkamble) यांनी अमरावती आरोग्य विभागात (Amravati Health Department) आरोग्य सेवक, लिपिक पदांच्या जागा असल्याचे सांगितले.
तसेच माझ्या वशिल्याने या जागांवर नोकरी लावतो. मात्र, त्यासाठी सात लाख रुपये लागतील असे सांगितले. सचिन जाधव यांच्या वडिलांनी दोन टप्प्यांत पैसे दिले. त्यातील पहिला हप्ता 30 जुलै 2020 मध्ये दिला, तर दुसरा हप्ता 16 ऑगस्ट 2022 रोजी दिला. पहिला हप्ता दिल्यानंतर 20 ऑगस्ट 2020 रोजी सचिनला फोन करून आरोग्य सेवक पदाची ऑर्डर आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले.
सचिन यादव याला यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणासाठी पाठवतो असे सांगितले.
मात्र, याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती (RTI) मागवली असता अशी कोणतीही नोकरभरतीची प्रक्रिया अमरावती आरोग्य विभागात झाली नसल्याचे समोर आले.
यानंतर नांदेड जिल्ह्यातील सात ते आठ युवक आणि महाराष्ट्रातील 50-60 बेरोजगारांना नियुक्तीपत्र देऊन फसवल्याचे समोर आले.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत किनवट पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याप्रकरणी आणखी किती तरुणांची फसवणूक झाली, यात आणखी किती जण आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती पाहता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करावे, अशी मागणी होत आहे.