बाजारात आली आहे चौकोनी चाकांची सायकल ; पहा आणि जाणून घ्या, ती कशी चालते ?

spot_img

बाजारात आली आहे चौकोनी चाकांची सायकल ; पहा आणि जाणून घ्या, ती कशी चालते ?

मित्रांनो, सर्वसाधारणपणे सायकल कशी चालते, तिची चाकं कशी असतात, याची तुम्हाला चांगलीच माहिती आहे, कारण तुम्ही आतापर्यंत गोल चाक असलेली सायकल चालवली आहे. मात्र एका पठ्ठ्यानं चक्क चौकोनी चाकांची सायकल तयार केली आहे, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की चौकोनी चाकांची ही सायकल चालते तरी कशी? तर या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला व्हिडिओदेखील दिला आहे. त्याद्वारे तुम्ही ही सायकल कशी चालते, हे पाहू शकता.

आज काल कोणाच्या मनात काय कल्पना येईल, ते काही सांगता येत नाही. मात्र मनात आलेल्या कल्पनेनुसार एखाद्या वस्तूची निर्मिती करणे, याला खूप कौशल्य लागतं आणि ते कौशल्य वापरून इच्छेप्रमाणे हवी ती वस्तू तयार करण्याचा निर्धार केलेली मंडळी शेवटी नक्कीच यशस्वी होतात.

हल्ली बाईकच्या जमान्यात सायकलचा वापर सहसा कोणी करत नाही. मात्र जे फिटनेसचे चाहते आहेत किंवा ज्यांना दररोज व्यायामाचा कंटाळा येतो, व्यायामाऐवजी ते सायकलवरुन चक्कर मारतात, अशीच लोकं सायकल वापरतात‌.

साहजिकच सायकलला दोन चाके आणि तीही गोल असतात. परंतु एका पठ्ठ्यानं चक्क चौकोनी आकाराची चाक असलेली सायकल तयार केली आहे.

या सायकलचं चाक चौकोनी असल्यामुळे ते गोल फिरत नाही. ते एका जागी स्थिर राहातं. पण चाकावर जे रबरी आवरण लावलं आहे, ते मात्र स्थिर नाही. सायकलचे पायंडल मारताच सामान्य सायकल प्रमाणेच ही सायकलसुद्धा धावू लागते.

ज्याप्रमाणे एखादं ट्रेडमील मशीन काम करतं, अगदी तीच संकल्पना या सायकलच्या निर्मितीमध्ये वापरण्यात आली आहे. ही सायकल पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. कारण अशी सायकल आजवर कोणीच पाहिली नव्हती.

आता ही सायकल बाजारात किती ग्राहकांच्या पसंतीला पडेल, ती पंक्चर होते का किंवा वर्षातल्या किती दिवसांत तिचे टायर्स घासतात, या सायकलचा सरासरी ताशी वेग किती त्याचप्रमाणे सायकल चालवताना जड जाते की हलकी, या सायकलची किंमत काय असेल बरं, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

 

ज्यावेळी भारतासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही सायकल विक्रीसाठी उपलब्ध राहील आणि जास्तीत जास्त लोक या सायकलचा वापर करतील, त्यावेळी या सायकलची उपयुक्तता, ताशी सरासरी वेग आणि या सायकलचे फायदे आणि तोटे हे सर्वांच्या समोर येतील. तोपर्यंत आपण एकच करायचं, चौकोनी चाकांची सायकल बाजारात येईपर्यंत तिची नुसती वाट पहात बसायचं.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :