पोलीस क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी मतांमध्ये गाठली ‘हजारी’ ; पराभूत उमेदवारांची मात्र झाली दमछाक!
अहमदनगर जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीच्या रविवारी (दि. 9) झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या परिवर्तन पॅनलच्या बहुतांश सर्वच उमेदवारांनी मतांमध्ये हजारी गाठली. अर्थात या उमेदवारांना 1 हजारच्या पुढे मते मिळाली. तर या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना पाचशेच्या आतच मतं मिळाली. या निवडणुकीत पराभूत उमेदवारांची मात्र चांगलीच दमछाक झाली.
दरम्यान, जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीचा निकाल जाहीर होताच पराभूत उमेदवारांनी विजयी उमेदवारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत सोसायटीच्या सभासदांनी या निवडणुकीत दिलेला कौल मोठ्या मनानं स्विकारला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. के. आव्हाड यांनी काम पाहिले.
या निवडणुकीत विजयी उमेदवारांना मिळालेली मतं अशी आहेत…
अभिजित दत्तात्रय अरकल ११२७
सविता चंद्रभान खताळ १०६१
भीमराज किसन खर्से १०२०
रिचर्ड रघुवीर गायकवाड ९९५
दीपक भास्कर घाटकर १०३९
संदीप काशिनाथ घोडके १०९९
संदीप सुरेश जाधव १०१९
वैभव मच्छिंद्र झिने १०२८
रेवनाथ कारभारी दहिफळे १०४०
जावेद बुढन शेख १०३३
सचिन सुदाम शिरसाठ १०३३
प्रज्ञा सुभाष प्रभुणे १०८०
बाळासाहेब काशिनाथ भोपळे १०५७
राहुल राजेंद्र द्वारके १०६२.