पोलिसांनी जप्त केलेल्या ‘त्या’ 33 टन तांदळाबाबत नुसताच गोंधळ!

spot_img
पोलिसांनी जप्त केलेल्या ‘त्या’ 33 टन तांदळाबाबत नुसताच गोंधळ!   तांदूळ ताब्यात घेण्याबाबतचा पोलिकडून पत्रव्यवहार नसल्याचं ऍडडिशनल डिएसओंचं म्हणणं!   त्याबाबत प्रांत कार्यालयाशी नुकताच पत्रव्यवहार केलाय..  सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे यांचा खुलासा!

 

एक महिन्यापूर्वी एमआयडीसी पोलिसांनी पांढरीपूल परिसरात 31 लाख रुपये किंमतीचा 33 टन तांदूळ जप्त केला होता. IMG 20221228 160537 या प्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीनं फिर्याद देण्यात आली होती. हा तांदूळ अद्यापही एमआयडीसी पोलीस ठाण्यात पडून आहे.

दरम्यान, कोर्टानं आदेश देऊनही पुरवठा विभागानं हा तांदूळ ताब्यात घेतला नाही, अशी बातमी एका अग्रगण्य वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. या संदर्भात ‘महासत्ता भारत’नं जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांशी संपर्क साधला.

त्यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी माळी या पुरवठा विभागाच्या सचिवांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत असल्याचं समजलं. त्यामुळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

ऍडडिशनल डिएसओंनी सांगितलं, की कोर्टाचा आदेश असतानाही पोलिसांनी जप्त केलेला तांदूळ पुरवठा विभागानं एक महिन्यानंतरही ताब्यात न घेतल्याची बातमी आम्हीही वाचली. मात्र ती बातमी चुकीची आहे. एमआयडीसी पोलिसांनी यासंदर्भात पुरवठा विभागाशी कुठलाही प्रस्ताव दिला नाही किंवा पत्रव्यवहार केलेला नाही.

वास्तविक पाहता एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करुन तो तांदूळ जप्त केला असला तरी पध्दत अशी आहे, की जप्त केलेल्या तांदळाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी प्रांत कार्यालयास पत्र व्यवहार करणं अपेक्षित आहे. मात्र पोलिसांनी असा प्रस्ताव पुरवठा विभागाकडे पाठविलेला नाही.

‘तो’ पत्रव्यवहार नुकताच सादर केलाय : सपोनि आठरे –  एमआयडीसी पोलिसांनी पकडलेला तांदूळ रेशनचाच आहे का,
याची शहानिशा करण्यासंदर्भात नगरच्या तहसील कार्यालयाकडे 5 आम्ही पत्र व्यवहार केला होता. मात्र जप्त तांदूळ पुरवठा विभागानं ताब्यात घेण्यासंदर्भात प्रस्ताव दिला नव्हता. मात्र पुरवठा विभागाला असा प्रस्ताव आम्ही नुकताच सादर केलाय, अशी माहिती एमआयडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे यांनी ‘महासत्ता भारत’शी बोलताना दिली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :