पेट्रोल डिझेल एलपीजी गॅसच्या कमतीमध्ये मोठी घसरण ?

spot_img

पेट्रोल डिझेल एलपीजी गॅसच्या कमतीमध्ये मोठी घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ही माहिती कितपत खरी आणि खोटी आहे. हे आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. देशातील तेल व्यापारी कंपन्यांनी दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या.

भारतामध्ये सकाळी 6 वाजता इंधनाच्या दाराची तपासणी होते. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमती सुधारल्या जात होत्या.

बिहारमध्ये पेट्रोल 25 पैशांनी 108.90 रुपये आणि डिझेल 23 पैशांनी 95.57 रुपये स्वस्त झाले आहे. छत्तीसगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 47 पैशांनी घट झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल सुमारे 1 रुपये आणि डिझेल 78 पैशांनी स्वस्त झाले आहे.

महाराष्ट्रामध्ये पेट्रोल 41 पैशांनी वाढून 106.85 रुपये तर डिझेल 93.35 रुपयांवर पोहोचले आहे. तर किरकोळ किंमतीने पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

देशभरात व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. देशामधील 4 महानगरांमध्ये ही कपात 171.50 रुपये आहे. नवीन दर १ मे पासून लागू होणार आहेत.

तेल ट्रेडिंग कंपनी इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर नवीन किंमत यादी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोचा गॅस सिलिंडर 2021.50 रुपयांना मिळेल, तर आधी त्याची किंमत 2192.50 रुपये होती.

एलपीजी गॅस दर

लेह- 1299

आयझॉल -1250

श्रीनगर- 1169

पाटणा- 1142.5

कन्याकुमारी- 1137

अंदमान – 1129

रांची- 1110.5

शिमला- 1097.5

दिब्रुगड- 1095

लखनौ- 1090.5

उदयपूर 1048.5

इंदूर- 1081

कोलकाता- 1079

डेहराडून- 1072

चेन्नई- 1068.5

आग्रा- 1065.5

चंदीगड- १०६२.५

विशाखापट्टणम- 1061

अहमदाबाद- 1060

भोपाळ- 1058.5

जयपूर- 1056.5

बंगलोर-1055.5

दिल्ली- 1053

मुंबई- 1052.5

या चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर;

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.86 रुपये.आणि डिझेल 94.46 रुपये प्रति लिटर.

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :