पेट्रोलवाढीच्या चिंतेला ठोका आता कायमचा राम राम ! ‘या’ कंपनीची आलीय ‘ही’ बाईक !
आपल्या भारतात पेट्रोलचे वाढते दर पाहून सामान्य मध्यमवर्गीय आणि चाकरमानी प्रचंड वैतागले आहेत. पण नाविलाजास्तव प्रत्येक जण ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करतो आहे. कारण आजमितीला पेट्रोलचे Petrol दर गगनाला भिडले आहेत.
मात्र आता यापुढील काळात सामान्य चाकरमानी लोकांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमती ऐकून ‘टेन्शन’ घेण्याचं काहीच कारण राहिलेलं नाही. कारण हिरो स्प्लेंडर Hero Splender या कंपनीच्या एका बाईकला इलेक्ट्रिक कन्व्हर्जन कीट (EV रुपांतरण कीट) बसविण्यात आली आहे.
या कीटची काय किंमत आहे, या कीटमुळे पेट्रोल दरवाढीपासून सर्वसामान्यांना कसा दिलासा मिळू शकतो, ही कीट बसविल्यानं या बाईकचं मायलेज किती मिळतं, या कीटसह या बाईकची एकूण किंमत किती, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत मन लावून वाचा.
भारतातली एक फर्म आहे, ज्या फर्मचं नाव आहे GoGoA1. या फर्ननं अधिकृतपणे Hero Splendor बाईकसाठी इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. या कंपनीला एप्रिलमध्ये ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) कडून या किटसाठी मंजुरी मिळाली होती.
या किटद्वारे कोणतीही व्यक्ती हिरो स्प्लेंडर बाइकचे इलेक्ट्रिक बाईकमध्ये रूपांतर करू शकते. या किटमध्ये 2 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आणि 2.8 kWh क्षमतेची बॅटरी पॅक आहे. याशिवाय रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिमचाही यात समावेश करण्यात आला आहे.
या किटला 2 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आणि 2.8 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह मिळते. हे रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह मागील चाकात हब मोटर आहे. सेटअपमध्ये DC-DC कनवर्टर, नवीन एक्सीलरेटर वायरिंग, की स्विचसह कंट्रोलर बॉक्स आणि एक नवीन स्विंगआर्मदेखील समाविष्ट आहे. कंपनीचा दावा आहे, की बॅटरी पॅक पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक 151 किलमीटरचं मायवेज देऊ शकते.
भारतातल्या पेट्रोलवाढीच्या समस्येला वैतागून अनेकांनी इलेक्ट्रिक बाईक खरेदीला पसंदी दिलीय. परंतू या इलेक्ट्रिक बाईकदेखील फारशा भरवशाच्या नसल्याचं अनुभवातून समोर आलंय. या इलेक्ट्रिक बाईकच्या तुलनेत हिरो स्प्लेंडर कंपनीची ही बाईक मजबूत आहे. या बाईकची किंमत 95 हजार रुपये असून एका चार्जिंगवर ही बाईक 151 किलोमीटर धावणार आहे.