पेटत्या चितेसमोर अघोरी पुजा केल्यानं कँन्सर जातो ?
जाणून घ्या, पुण्यातला हा अंधश्रध्देचा प्रकार !
आजच्या विज्ञानयुगातही अनेक जण अंधश्रध्देचा आश्रय सोडायला तयार नाहीत. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातदेखील अंधंश्रध्देवर विश्वास ठेवला जातो, हे ऐकून हसावं, की रडावं, असं होतं. विशेष म्हणजे विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे Pune शहरात नुकताच हा प्रकार समोर आलाय.
पुण्यातल्या वैकुंठ स्मशान भूमी Vaikunth Smashan Bhumi इथं एका पेटत्या चितेसमोर लक्ष्मी निबाजी शिंदे Lakshmi Nibaji Shinde आणि मनोज अशोक धुमाळ Manoj Ashok Dhumal या दोघा संशयितांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय.
पेटत्या चितेसमोर अघोरी पुजा केल्यानं कँन्सर जातो, अशी तृतीयपंथियांमध्ये अंधश्रध्दा आहे. त्यानुसार रात्री ही अघोरी पुजा करण्यात आली. या स्मशानभूमीतल्या कर्मचार्यानं पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं.
पेटत्या चितेसमोर जादूटोणा किंवा अघोरी पुजा केल्यानं आईच्या शरिरातला कँन्सर निघून जातो, या कल्पनेमुळे ही अघोरी पुजा केल्याची या दोघांनी पोलिसांना कबुली दिली.
दरम्यान, डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार कँन्सर हा अनेक प्रकारचा असतो. मात्र कँन्सरचा इलाज अशी अघोरी पुजा केल्यानं झाला असता तर मेडीकल सायन्यचं हे अपयश म्हणावं लागलं असतं.
आजमितीला देशभरात कँन्सरवर इलाज करणारे बहुमजली, अद्ययावत अशी हाॅस्पिटल्स आणि तज्ज्ञ डाॅक्टर्स या आजाराच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करताहेत. पाश्चात्य देशातही या गंभीर आजारावर इलाज सुरु आहेत. मात्र अघोरी पुजेनं कँसर जातो, ही केवळ अंधश्रध्दा आहे.
आजच्या 21 शतकात विज्ञानानं खूप सारी प्रगती केलीय. मात्र कँन्सरवर रामबाण उपाय शोधून काढण्यात विज्ञानानंही या आजारासमोर गुढघे टेकले आहेत. मात्र गरीब आणि अशिक्षित व्यक्तींमध्ये अंधश्रध्देचं प्रमाण खूप असतं.
मुळामध्ये कँसरवरचे इलाज खूप महागडे आहेत. हातावरचं पोट असलेल्यांना ते परवडत नाहीत. त्यामुळे अशिक्षितपणा आणि गरीबीमुळे ही मंडळी अंधश्रध्देच्या आहारी जातात. काहींनी तर मंत्राद्वारे कँसरवर इलाज करण्याचा दावा केलाय. मात्र विज्ञानयुगात यावर किती विश्वास ठेवायचा, हे प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे.