जुन्या काळी शिवाजी महाराजांच्याकाळात मुळा नदीच्या किनारी पुनवडी नावाचे गाव होते.महाराजणी कसबा पेठेव जवळ लाल महाल बांधला.” “तिथे वस्ती वाढू लागली.पण स्वराज्यावर आक्रमणे होऊ लागली.जशी वस्ती वाढत होती तसेच चौक्या किंवा नाक्यावमचे ठिकाण बसत होते.
ही महत्वपूर्ण ठिकाणं इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली. इंग्रज काळातील कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव ‘गेट’ असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे “स्वारगेट” असे ओळखले जाऊ लागले.
आजतागायत ते नाव तसेच राहिले आहे.(पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते)
सातारा ही राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी बसवलेली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी, जकात वसूल आणि इतर सामाजिक सुरक्षितेसाठी करण्यासाठी सुद्धा होत असे.
स्वारगेट सोडून कोंढवा गेट क्वार्टर गेट जाईचे गेट पूल गेट पेरू गेट फडगेट मरीआई गेट म्हसोबा गेट, रामोशीगेट, पुलगेट ही गेट आजही पुण्यात अस्तित्वात आहेत. पैकी रामोशीगेट येथे चौक्यांवर पहारेकरी म्हणून रामोशी समाजातील लोकांची नेमणूक केली जायची. त्यावरून तिथल्या जागेला ‘रामोशीगेट’ असे नाव मिळाले.स्वारांचा पहारा or गेट या जागेवर पूर्वी होते त्यामुळे नाव ”स्वारगेट” पडले,