पुण्याच्या वारजेत एकानं केला गोळीबार ! Fire In Warje At Pune पुणे आयुक्तांना गुन्हेगाराचं आव्हान ?

spot_img

पुण्याच्या वारजेत एकानं केला गोळीबार ! Fire In Warje At Pune पुणे आयुक्तांना गुन्हेगाराचं आव्हान ?

पुण्याचे आयुक्त रितेशकुमार (Police Commissioner of Pune Ritesh Kumar
यांनी पदभार स्विकारल्यानंतर एकानं पुण्याच्या वारजे Warje भागातल्या रामनगर Ramnagar परिसरात वेताळबाबा नावाच्या चौकात एकानं काल (दि. 16) गोळीबार केला.

कार्तिक इंगवले असं गोळीबार करणार्‍याचं नाव असून मित्रानं 500 रुपये दिले नाहीत, म्हणून त्यानं गोळीबार केल्याचं सांगितलं जातंय. मात्र गोळीबाराची ही घटना पुण्याचे आयुक्त रितेशकुमार यांच्यासाठी एक आव्हान असल्याची चर्चा पुण्यात रंगलीय.

पुण्यातली वाढती गुन्हेगारी आणि मुंबईतल्या अनेक गुन्हेगारांनी पुण्यात बस्तान बांधून गुन्हेगारी साम्राज्य उभं केल्यानं पुणेकरांची डोकेदुखी चांगलीच वाढलीय. जिन्याच्या पायर्‍यांवर चप्पलचा जोरात केलेला आवाजही सहन न करणार्‍या पुणेकरांना गावठी पिस्तुलाची फायरिंग केवळ नाविलाजास्तव ऐकून घ्यावी लागत आहे.

पुण्यातली वाढती गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर ‘आ’ वासून उभं आहे. मुंबईतल्या अंडरवर्ल्डला Mumbai Underwrold पोलिसांचा काहीसा धोका जाणवायला लागल्यानं अनेक गुन्हेगारांनी पुण्याचा पर्याय स्विकारलाय.

या गुन्हेगारांनी रियल इस्टेटसह अनेक क्षेत्रांत शिरकाव केलाय. यातून सामान्यांची डोकेदुखी वाढली असून वेळोवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

या घटनेच्या माध्यमातून भररस्त्यात गोळीबार करुन एक प्रकारे पोलीस यंत्रणेलाच कडवं आव्हान देण्यात आलंय. कार्तिक इंगवले या तरुणाकडे पिस्तूल कुठून आलं? या पिस्तुलाच्या धाकातून त्यानं आतापर्यंत कोणाकोणावर दहशत निर्माण केली? पिस्तूल बाळगणार्‍या आणखी कोणाकोणाशी त्याचं ‘कनेक्शन’ आहे, या शोध पुणे पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :