पिंपरी चिंचवड पोलिसांनी आवळल्या दरोड्यातल्या गुन्हेगारांच्या मुसक्या!

spot_img

पिंपरी चिंचवड पोलिसांनी आवळल्या दरोड्यातल्या गुन्हेगारांच्या मुसक्या!

पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका घरावर अनोळखी गुन्हेगारांनी दुपारी पावणे दोनच्या सुमारास दरोडा टाकून 24 तोळे सोनं आणि रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज चोरुन नेला.

दि. १० जानेवारी रोजी घालण्यात आलेल्या दरोड्याच्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी भादंवि 395, 452, 323,506 आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 3 कडे दरोड्याच्या या तपास वर्ग करण्यात आला. पोलीस आयुक्त चौबे यांनी गुन्हे शाखेसह पिंपरी चिंचवड हद्दीतल्या सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना या गंभीर गुन्ह्यातल्या गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार पोलिसांनी शोध घेऊन आणि सापळा लावून या गुन्ह्यातल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत अमर हरीदास दहातोंडे (वय – 20, रा. वडाळा, ता. नेवासा, जि. अ. नगर हल्ली रा. चिबळी फाटा, बर्गे वस्ती, यशवंत जाधव यांच्या खोलीत, ता. खेड, जि. पुणे), अनिल गोरक्षनाथ म्हस्के (वय – 30, रा. चिबळी फाटा, बर्गे वस्ती, यशवंत जाधव यांच्या खोलीत, ता. खेड, जि. पुणे), राजू रविशंकर यादव (रा. तळेगाव दाभाडे), सोपान अर्जून ढवळे (रा. बुलढाणा) आणि प्रशांत राजू काकडे (रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यापैकी राजू यादव आणि सोपान ढवळे या दोघांना हाॅटेल व्यवसायासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे या सर्वांनी दरोड्याचा कट रचला.

या गुन्हेगारांना फिर्यादी हे गुटख्याचे व्यापारी असून त्यांच्या खूप पैसा असल्याची माहिती होती. त्यामुळे या गुन्हेगारांनी पाळत ठेवून दिवसा ढवळ्या दरोडा घातला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :