पंतप्रधान नरेद्र मोदींसाठी कसं असणार 2023 हे नवं वर्ष ?

spot_img

पंतप्रधान नरेद्र मोदींसाठी कसं असणार 2023 हे नवं वर्ष ?

 

भविष्यकाळ जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते.

सध्या सगळीकडे नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. त्यामुळे प्रत्येकजण येणाऱ्या नवीन वर्षाकडे उत्साहाने पाहतोय. नवं वर्ष कसं जाणार, याची उत्सूकता प्रत्येकाला असते. पण तुम्हाला माहिती आहे,का पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नवीन वर्ष कसं जाणार?

 

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) यांनी मोदींचं नवं वर्ष कसं जाणार, याविषयी सांगितलंय. ग्रहस्थितीनुसार यांना येणारे नवीन वर्ष नेत्रदिपक कामगिरी करण्यासाठी सुयोग्य ठरणार आहे.

 

येत्या नवीन वर्षात नरेंद्र मोदींच्या हस्ते मोठे ऐतिहासिक निर्णय होऊ शकतील, ज्यातून उत्कृष्ट सफलता त्यांना प्राप्त होईल.

ज्यात प्रामुख्याने समान नागरी कायदा, आर्थिक निकषांनुसार आरक्षण असेल, तत्सम देशहितकारक निर्णय असे महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान मोदी घेऊ शकतील. त्यांच्या मनोकामनादेखील येत्या नवीन वर्षात पूर्ण होतील.

 

फेब्रु – मार्च 2023 नंतरचा काळ त्यांच्यासाठी लाभदायक असून महत्वपूर्ण असे मोठे निर्णय या नंतर त्यांनी घ्यावे, तसा ते घेतील. यासह संकटमयी काळ या वर्षात त्यांच्या कुंडलीतल्या ग्रह भावांध्ये नसल्याने संपूर्ण वर्ष त्यांच्यासाठी उत्तम फलदायी अन् महत्वपूर्ण ठरणार आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :