पंतप्रधान नरेंद्र मोदी तुझे ‘लंगोटी यार’ नाहीत! जरा त्यांच्या वयाचा विचार कर!

spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदी तुझे ‘लंगोटी यार’ नाहीत! जरा त्यांच्या वयाचा विचार कर!

नेटकर्‍यांनी शाहरुखला ट्विटरवरुन प्रचंड झापलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं दि. ३० डिसेंबर रोजी निधन झालं. १०० व्या वर्षी त्यांनी अहमदाबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये पोहोचले आणि त्यांनी आईचे अंत्यविधी केले.

पंतप्रधानांना मातृशोक झाल्यानंतर अनेक राजकारणी आणि कलाकारांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेता शाहरुख खाननेही ट्वीट करत पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. पण या ट्वीटमुळे शाहरुख ट्रोल होत आहे.

पंतप्रधान मोदींच्या आईचं निधन ३० डिसेंबरला पहाटे झालं आणि त्याचं दिवशी १२ वाजेपर्यंत त्यांचे अंत्यसंस्कार झाले. पण, शाहरुखने ३१ डिसेंबर रोजी ट्वीट केलं. “पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेनजी यांच्या निधनाबद्दल यांना मनापासून शोक व्यक्त करतोय. माझ्या कुटुंबाच्या प्रार्थना सर तुमच्या पाठीशी आहेत. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो,” असं शाहरुखने सकाळी ट्वीट केलं. पण या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

त्याच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तुला दोन दिवसांनी आठवण झाली, भगवान तुला सदबुद्धी देवो”, असं एका युजरने म्हटलंय. “आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या आईचे निधन झाल्याचे तुम्हाला फारच लवकरच कळले. लाज वाटते तुमच्या सारख्या लोकांची, ज्यांना तुम्ही राहता त्या देशात काय चालले आहे हे देखील माहित नाही,” असं आणखी एका युजरने म्हटलंय.

एक दिवसांनी आठवण आली, उगाच सहानुभूती दाखवायची गरज नाही, कोणती नशा करतोस तू, त्यांच्या आईचं काल पहाटे साडेतीन वाजता निधन झालं आणि साडेनऊ वाजेपर्यंत अंत्यसंस्कारही झाले होते. पण यांचं आज ट्वीट आलंय, वाटतंय काल नशेत होतास, अशी कृती करतात आणि मग लोक आम्हाला देशविरोधी बोलणारे का म्हणतात, असे प्रश्न विचारतात,” अशी टीका एका सोशल मिडिया युजरने केलीय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :