पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक! 100 वर्षीय हिरा बेन यांचे निधन!

spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक!   100 वर्षीय हिरा बेन यांचे निधन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबाई यांचं आज वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं. शतायुषी जगणं ही आपल्याकडे मोठी गोष्ट समजली जाते. त्यामुळे एक समृद्ध आयुष्य जगून, त्यातल्या भल्याबुऱ्या गोष्टींसहीत हिरा बेन आज निघून गेल्या.

आपला मुलगा देशाचा पंतप्रधान झाला ही अत्यंत आनंदाची गोष्टही त्यांनी पाहिली आहे. मोदींविषयी कोणाला काय वाटो ते वाटो पण आज त्यांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.

माणूस कितीही मोठा असला तरी त्याचे आईवडील जीवंत आहेत, तोवर त्याला एक आधार असतो. आईवडील गेल्यानंतर पोरकेपणाची भावना दाटून येते.

अनेक जण याचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींविषयी देशवासियांना सहानुभूती आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’, असं कोणी तरी म्हटलंय, ते नक्की चूक नाही.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :