पंकजा गोपीनाथ मुंडे! लवकरच करणार राष्ट्रीय राजकारणात ‘एन्ट्री’! 

spot_img

पंकजा गोपीनाथ मुंडे! लवकरच करणार राष्ट्रीय राजकारणात ‘एन्ट्री’!  2024 च्या निवडणुकीची केली तयारी सुरु!

भाजपचे संघर्षशील नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तृत्वान नेत्या पंकजा मुंडे या विधानसभेच्या पराभवानं अजिबात खचून गेलेल्या नाहीत. वडिलांच्या संघर्षाचा वारसा त्या मोठ्या नेटानं आणि प्रामाणिकपणे पुढे चालवित आहेत. हिंदी भाषेतून युट्युब चॅनलवरुन त्यांच्या हितचिंतकांशी त्या अधून मधून संवाद साधत असतात.

पंकजा मुंडे या लवकरच राष्ट्रीय राजकारणात ‘एन्ट्री’ घेणार असल्याचे संकेत त्यांच्याकडून सध्या दिले जात आहेत. दरम्यान, आगामी 2024 च्या निवडणुकीची त्यांनी तयारी सुरु केल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांमार्फत सांगितलं जातंय. नव्या वर्षापासून हिंदी भाषेच्या माध्यमातून संपूर्ण भारतातल्या वंजारी समाज बांधवांशी संवाद साधण्याचा त्यांनी संकल्प केलाय.

विधानसभेच्या पराभवानंतर पक्षाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर पद देऊन पक्षासाठी काम करून सक्रिय राहण्यासाठी उभारी दिली आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी विविध राज्याच्या निवडणुकांमध्येदेखील प्रचार करत आपला वक्तृत्वाचा बाणा दाखवून दिला. त्यातच मध्यप्रदेश सारख्या हिंदी भाषिक राज्याची पक्षांतर्गत जबाबदारीदेखील त्यांना मिळाली. त्यामुळे पंकजा मुंडे या हिंदीमध्ये आणि हिंदी भाषिक लोकांमध्ये आपलं व्यक्तित्व आणि पक्ष कार्यकर्त्यांसह चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण युट्युबवर येत असल्याचं आणि वेळोवेळी संवाद करत करणार असल्याचं सांगितले.

असं जरी असलं तरी देखील या सर्वांवरून पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय व्हायचे की काय अशा चर्चा जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात सुरु झाल्या आहेत. पंकजा मुंडे 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याआहेत.

2024 मध्ये निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे याबाबत पंकजा मुंडे यांना वेळोवेळी विचारले असता, आता आम्ही 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागलो असल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभेची जागा लढवून राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय व्हायचे की काय अशी चर्चा जिल्हा सह राज्यभरामध्ये सुरु झाली आहे.

पंकजा मुंडे यांनी थेट अजून यावर बोलणं टाळलं जरी असलं तरी त्यांच्या मनातले भाव आणि हिंदीतून त्यांनी लोकांशी साधलेला संवाद हे खूप काही सांगून जातात.

मराठी आणि अस्सल मराठवाडी भाषेमध्ये पंकजा मुंडे लोकांशी थेट संवाद साधतात. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली झाल्यानंतर त्यांचा वसा आणि वारसा जपण्यासाठी त्या राजकारणात ठामपणे उभा राहिल्या. त्यांनी काढलेली संघर्ष यात्रा आणि या संघर्ष यात्रेनंतर झालेल्या निवडणुका आणि त्यामध्ये भाजपला मिळालेले यश यामुळे पंकजा मुंडे यांनी आपण जनतेच्या मनातल्या ‘मुख्यमंत्री’ असल्याचा देखील उच्चार केला. त्यानंतर काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलं, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले.

2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला. खरंतर माजी मुख्यमंत्री आणि सध्या असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये राजकीय मतभेद असल्याचे या ना त्या कारणाने समोर आले.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर या दोघांमधील मतभेद आता संपले असल्याचं आणि आपण देवेंद्र फडणवीस हे आपल्या पक्षाचे नेते आहेत म्हणून भेटल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलंय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :