नोटबंदीचा बसला फटका; 2000 च्या नोटांचा भरणा ‘या’ बँकेने नाकारला..! नागरिक संभ्रमात..,

spot_img

नोटबंदीचा बसला फटका;
भिंगारच्या महेश नागरी पतसंस्थेचा भरणा अहमदनगरच्या एडीसीसी बँकेने नाकारला!

दोन हजाराची नोट बंद करण्यात येणार आहे. मात्र रिझर्व बॅंकेच्या या निर्णयाची अद्याप तरी अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतू या आगामी नोटबंदीचा एका पतसंस्थेला बसलाय. अहमदनगरजवळील भिंगारच्या महेश नगरी पतसंस्थेचा दोन हजारांच्या नोटा असलेला चार लाख रुपयांचा भरणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज नाकारलाय.

रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच करण्यात आलेली नाही. आणखी तीन महिने यासाठी मुदतवाढ देण्यात आलेले आहे. मात्र अहमदनगरच्या पिडीसीसी बँकेने महेश नागरी पतसंस्थेचा हा भरणा स्वीकारला नाही. या संदर्भात महेश नागरी पतसंस्थेच्या अधिकाऱ्याला बँकेच्या रोखपालनं सांगितले, की आम्हाला केंद्र सरकारचे तोंडी आदेश आहेत, की दोन हजारांच्या नोटा स्वीकारू नका.

महेश नगरी पतसंस्थेच्या सदर अधिकाऱ्याने रोखपालाला लेखी आदेश देण्याची मागणी केली. मात्र आमच्याकडे लेखी नसून तोंडी आदेश आहे, असं म्हणत त्या रोखपालाने उडवाउडवीची उत्तरे दिली. हा भरणा न घेतल्यामुळे पतसंस्थेच्या संबंधित अधिकाऱ्याला चार लाखाची रक्कम पुन्हा पतसंस्थेत घेऊन जावं लागलं.

दोन हजार रुपयांच्या नोटा संदर्भात रिझर्व बँकेचा निर्णय प्रस्तावित असताना आणि दोन हजार रुपयांच्या नोटा न स्विकारण्यासंदर्भात कुठलेच आदेश नसताना देखील अहमदनगरच्या एडीसीसी बँकेने पतसंस्थेचा चार लाखांचा हा भरला नाकारल्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बँकेच्या अशा वर्तनामुळे सर्वत्र संभ्रमावस्था पसरली आहे.

दरम्यान, दोन हजारांच्या दहा नोटा म्हणजे वीस हजार रुपये सुटे करण्याची व्यवस्था बँकेने उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी कोणाची अडवणूक करू नये, असज रिझर्व बँकेचे आदेश आहेत. दररोज वीस हजार रुपये सुट्टी घेऊ शकता. मात्र 20000 पेक्षा जास्त रक्कम तुम्हाला बँक देऊ शकणार नाही.

परंतु 2 हजार रुपयांच्या कितीही नोटांचा भावना तुम्ही बँकेत करू शकता. मात्र हे एडीसीसी बँकेने घेतलेला हा निर्णय मोठा संतापजनक असल्याची चर्चा या निमित्ताने ऐकायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :