नियोजित ‘राजर्षी’ चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन संपन्न

spot_img

नियोजित ‘राजर्षी’ चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन संपन्न IMG 20230505 WA0279

‘साई वाणी’ प्रोडक्शन संस्थेतर्फे राजर्षी छत्रपति शाहू महाराज यांच्या कल्याणकारी विचारांवर आधारित ‘राजर्षी‘ या सामाजिक मराठी नियोजित चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन आज पुण्यात हॉटेल प्रेसिडेंट येथे समारंभपूर्वक करण्यात आले.

या चित्रपटात राजर्षी छत्रपति शाहू महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील नानासाहेब करपे यांच्या हस्ते व सहकार्यांच्या उपस्थितीत प्रकाशन केले गेले. या आगामी चित्रपटाचे लेखक, पटकथा व संवाद लेखन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पवार असून धनंजय भावलेकर चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. याचे निर्माते सुदर्शन विष्णू ढेरे असून पुणे, सातारा, कोल्हापूर येथे चित्रीकरण पूर्ण होऊन या वर्षअखेर डिसेंबर महिन्यात हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

राजर्षी छत्रपति शाहू महाराज यांनी केलेला शिक्षण प्रसार व त्यासाठी केलेली वस्तीगृहांची सोय, युवकांना मार्गदर्शन, आरक्षण अशा विविध महत्वाच्या विषयांवर हा चित्रपट प्रकाश टाकेल. राजर्षी छत्रपति शाहू महाराजांच्या उदात्त व प्रेरणादायी विचारांचा जागर या चित्रपटाच्या रूपाने तरुण पिढीसह सर्वांना पाहायला मिळेल असे अभिनेते सुनिल करपे यांनी याप्रसंगी सांगितले.

या प्रसंगी प्रमुख अभिनेता सुनील नानासाहेब करपे यांच्या समवेत दिग्दर्शक धनंजय भवलेकर, निर्माते सुदर्शन विष्णू ढेरे, उद्योजिका चित्रा मेटे, पुणे बार असोसिएशन – खजिनदार ॲड समीर बेलदरे व अन्य सहकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :