नागरिकांना मध्यरात्री लुटणारी टोळी जेरबंद; कोतवाली पोलिसांची दमदार कामगिरी

spot_img

नागरिकांना मध्यरात्री लुटणारी टोळी जेरबंद; कोतवाली पोलिसांची दमदार कामगिरी

आज (दि. १२ ) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास फिर्यादी अमित विलास तोरकडी (रा. धांदरफळ ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली की, काल दि. ११ रोजी ते व त्यांचा मेहुना प्रविन कोल्हे असे दोघे संगमनेर ते शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी त्यांचे कडील बजाज प्लॅटीना मोटार सायकल वरुन अहमदनगर मार्गे जाणे करीता निघाले होते.

माळीवाडा बसस्थानकात इन गेटने इम्पिरीयल चौकाकडून जात असताना त्यांचे मोटार सायकलला रात्री १० / ४५ वा च्या सुमारास २० ते ३० वयोगटातील ४ इसम आडवे झाले व त्या मधील भगवा शर्ट व आकाशी रंगाची जिन्स घातलेल्या सडपातळ इसमाने फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील मोबाईल फोन हा बळजबरीने काढून घेतला व तेथून पळुन गेले.

वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३५६ / २०२३ भादंवि कलम ३९२.३४१.३४ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल होताच फिर्यादी यांनी दिलेल्या आरोपींच्या वर्णनाप्रमाणे तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा करणारे आरोपी हे भिंगार येथील राहणारे आहेत. त्यांनीच सदरचा गुन्हा केला असून ते सध्या कल्याण रोडला दिनेश हॉटेलच्या मागे एका बैठ्या चाळीत थांबलेले आहेत.

या माहितीनुसार सदर ठिकाणी कोतवाली पोलिसांनी तात्काळ जावून शोध घेतला असता सदर वर्णनाचे १) विशाल बाबासाहेब गायकवाड २) अतुल राम ननवरे ३) सोमेश पवन साळवे ४) अविनाश अशोक शेलार सर्व (रा. भिंगार अहमदनगर) यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आलं.

या गुन्हेगारांकडे गुन्हयाच्या अनुषंघाने चौकशी केली असता त्यानी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी करता त्यानी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे व त्यांचेकडून सदर गुन्ह्यातील गेला माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, परिविक्षाधीन पोसई शितल मुगडे हे करीत आहेत. सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव परिविक्षाधीन पोसई शितल मुगडे, पोसई मनोज महाजन, मनोज कचरे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, सतिष भांड, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, इसराईल पठाण, अतुल काजळे, भरत गाडीलकर, प्रशांत बोरुडे, याकूब सय्यद यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :