नगर तालुक्याच्या तहसील कार्यालयातला ‘हा’ पठ्ठ्या सांभाळतोय चक्क तीन तीन टेबल! ‘हा’ पाॅवरबाज कारकून कायम वावरतोय एजंटांच्या गराड्यात!

spot_img

नगर तालुक्याच्या तहसील कार्यालयातला ‘हा’ पठ्ठ्या सांभाळतोय चक्क तीन तीन टेबल!

‘हा’ पाॅवरबाज कारकून कायम वावरतोय एजंटांच्या गराड्यात!

तहसीलदार साहेब! याकडे लक्ष द्यायला आपणांस वेळ मिळेल?

‘सरकारी काम आन् दहा वर्षे थांब’, असं सामान्य माणसं उगीचंच बोलत असतात, असा तुमचा कदाचित अपसमज किंवा गैरसमज होऊ शकतो. मात्र नगर तालुक्यातल्या तहसील कार्यालयातला एक कर्तव्यदक्ष (?) अधिकारी याला अपवाद म्हणावा लागेल. कारण हा अधिकारी एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन तीन टेबल सांभाळतो आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक अधिकारी तीन तीन टेबल कसं काय सांभाळू शकतो? तर यामागे एक जादू आहे. प्रथम ‘हा’ पठ्ठ्या नक्की कोणकोणते टेबल सांभाळतो, हे पाहू. तर हा अधिकारी पुरवठा निरीक्षक, अव्वल कारकून आणि एसईईके असे तीन टेबल पाहतो.

हे तीन तीन टेबल पाहणार्‍या ‘शिव’चं ‘राज’ भलतंच पाॅवरबाज आहे. या कार्यालयात या अधिकार्‍याभोवती कायम एजंट किंवा खासगी इसमांचाच गराडा असतो. कारण ‘हा’ पठ्ठ्या नगर तहसील कार्यालयात अधिकारी असला तरी या काॅम्प्युटर म्हणजे संगणक अजिबात चालवता येत नाही. म्हणजे या कामाचा त्याला प्रचंड कंटाळा आहे, असं तुम्ही म्हणू शकता.

काॅम्प्युटर हाताळण्याऐवजी ‘हा’ पठ्ठ्या आठ ते दहा एजंट किंवा खासगी इसमांकडूनची वेगवेगळी कामं करुन घेतो. प्रश्न असा आहे, नगर तहसील कार्यालय ही सरकारी मालमत्ता आहे. इथं सरकारनं नियुक्त केलेले अधिकारी करत असताना हे पाच – सहा एजंट किंवा खासगी इसम या कार्यालयात नक्की काय करताहेत?

या मंडळींना सरकारी कार्यालयात बसण्याचा, सरकारी काॅम्प्युटर वापरण्याचा अधिकार कोणी दिला ? नगर तहसील कार्यालयात खासगी इसमांचा सर्रास वावर कसा सुरु आहे? या खासगी इसमांंना दर महिन्याला पगार किती? आहे आणि तो पगार नक्की कोण देतं? मुख्य म्हणजे या सावळ्या गोंधळाकडे लक्ष द्यायला नगर तालुक्याच्या तहसिलदारांना वेळ मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नगर तालूका तहसील कार्यालयात शासकीय नियुक्तीवर असलेला या ‘शिव’च्या ‘राज’चा ‘पाॅवर’ इतका आहे, की साक्षात तहसीलदारही या ‘पठ्ठ्या’विरुध्द काहीही करु शकत नाही. कारण हा पठ्ठ्या इतकी कामं करतो, असा या कार्यालयातल्या वरिष्ठांचा कदाचित गैरसमज झालेला असावा.

‘हा’ पठ्ठ्या अव्वल कारकून म्हणजे कुपनांवर सह्या करणं, पुरवठा निरीक्षक म्हणजे रेशनकार्डधारकांना धान्य वाटप होतं की नाही, ते पहाणं आणि एसइइके म्हणजे चलनं पास करणं एवढी सारी कामं करतो.
मात्र खरं तर ‘हा’ पठ्ठ्या एका अर्थानं ‘ऊंटावरुन शेळ्या हाकण्या’चंच काम करतो आहे.

हा एकटा कारकून जरी तीन तीन टेबल सांभाळतो, असं वाटत असलं तरी या पठ्ठ्याची सारी कामं या कार्यालयातले पाच – सहा एजंटच करताहेत. या अधिकार्‍याला नगर तहसील कार्यालयासमोरील ‘त्या’ कार्यालयात खरं तर ऑनलाईन काम करण्याचा प्रचंड कंटाळा आहे.

‘हा’ कारकून ऑनलाईनची कोणतीही कामं करत नाही. एक एजंटच ते सारं काम करतो. कारण या ‘शिव’च्या ‘राज’ची पाॅवरच लई जबरदस्त आहे. सरकारी कागद हा खूप मोठा ऐवज असतो. मात्र या कार्यालयात एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे तर चक्क पाच ते सहा खासगी इसम सर्रासपणे वावरत आहेत.

नगर तहसीलच्या सरकारी कार्यालयातल्या एका विभागात जर पाच – सहा खासगी इसम रोजच घुटमळत असतील तर या सरकारी कार्यालयात गैरकृत्ये किंवा भ्रष्टाचार होत नसेल हे कशावरुन? त्यामुळे नगर तहसिलदारांनी एकदा या विभागाची झाडाझडती घ्यायला काय हरकत आहे, असाही सवाल यानिमित्तानं उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :