नगर तालुका बाजार समिती रणधुमाळी….जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले म्हणाले…
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक होत आहे. गेल्या १५ वर्षांपासून भाजपा नेते शिवाजी कर्डिले, माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या ताब्यात बाजार समितीची सत्ता आहे. कर्डिले-कोतकर यांना शह देण्यासाठी यंदा नगर तालुका महाविकास आघाडीने जिल्हा परिषद सदस्यांना रिंगणात उतरवले आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून बाजार समितीवर भाजपा नेते शिवाजी कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांची एक हाती सत्ता आहे. कर्डिले-कोतकर यांच्या सत्तेला शह देण्याचा नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न चालविला आहे. दरम्यान भाजपा नेते कर्डिले यांनी बाजार समितीच्या अनुषंगाने मतदारांची म्हणणे ऐकूण घेण्यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांसह मतदारांना भेटी-गाठीसाठी वाळूंज येथे बोलावले आहे. मतदारांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतरच त्या परिसरातील संबंधित उमेदवारास अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.