नगर एलसीबीनं केली खुनाच्या गुन्हयातल्या आरोपीला अटक !
अहमदनगर शहरातल्या लालटाकी परिसरात चार वर्षांपूर्वी एकाचा खून झाला होता. या गुन्ह्यात चार वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. बाळू अशोक घोरपडे वय 36, रा. सिध्दार्थ नगर, अहमदनगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शहरातल्या माया वसंत शिरसाठ (वय 35, रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी, अहमदनगर) यांची बहीण भारती आव्हाड (रा. पाथर्डी व फिर्यादी यांच्या शेजारी राहणारे सारीका भारस्कर यांचे नातेवाईकांचे पाथर्डी येथे भांडणे झाली होती.
त्या कारणावरुन दि. 10 रोजी दुपारचे वेळी सारीका भारस्कर व त्यांचे नातेवाईक नितीन दिनकर तसंच इतर आरोपींनी फिर्यादी व तिची सासू बेबी शिरसाठ व इतर नातेवाईकांना लाकडी दांडके, चाकू, तलवारी या हत्यारांनी मारहाण करुन जखमी केले होते.
या मारहाणीत फिर्यादी यांची सासू बेबी शिरसाठ यांचा मृत्यू झाला. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यावरुन गुरनं. 599/2019 भादवि कलम 302, 143, 147, 148, 149, 307, 504, 506 सह भाहकाक 4/25 सह मपोकाक 31 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे एकूण 19 आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यानच्या काळात अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधिक्षक,
राकेश ओला यांनी फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोनि दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा) यांना आदेश दिले होते.
या आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतल्या पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. या सुचनेप्रमाणे पथक फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोनि आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली, की आरोपी बाळू घोरपडे हा त्याच्या राहत्या घरी आला आहे.
त्या माहितीनुसार पोनि आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून खात्री करुन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने पथकातील पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोना विजय ठोंबरे, पोकॉ सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे व रणजीत जाधव अशांनी मिळून बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याला त्याचं नाव, गांव विचारलं असता त्याने त्याचे नाव सांगितले. त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने नमूद गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये हजर केले. पुढील कारवाई तोफखाना पोस्टे करीत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला (जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर) प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, अनिल कातकाडे, (उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, अहमदनगर) यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली.