नगरच्या दोन जिवलग मित्रांचा जीव जडला मध्य प्रदेशातील एकाच महिलेवर अन् बाईपायी खेळचं केला

spot_img

अहमदनगरच्या दोन जिवलग मित्रांचा जीव जडला मध्य प्रदेशातील एकाच महिलेवर अन् बाईपायी खेळचं केला

 

मुंबई: मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील मासी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला.सिंध नदीच्या किनारी भागात तरुणाचा मृतदेह आढळुन आला आहे.हा तरुण गेल्या ५ दिवसांपासून बेपत्ता होता.या तरुणाची हत्या त्याच्याच मित्रानं केली.त्याला अटक करण्यात आली आहे.इंदारमध्ये वास्तव्यास असलेला ३५ वर्षीय राकेश रघुवंशी १२ डिसेंबरच्या रात्रीपासुन बेपत्ता होता.पोलीस आणि नातेवाईक त्याचा शोध घेत होते.

 

राकेशची हत्या त्याचा मित्र संतोष चौहाननं केली.गोळी झाडुन त्यानं राकेशला संपवलं.यानंतर त्याचा मृतदेह नदी किनारी दगडांखाली लपवुन ठेवला.राकेश रघुवंशी आणि संतोष चौहान यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री होती.हे दोघेही मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी होते.ते कामानिमीत्त १ वर्षापासुन मध्य प्रदेशमध्ये स्थायिक झाले होते.

 

काही दिवसांपुर्वी दोघे गावातील एकाच महिलेच्या प्रेमात पडले.हेच राकेशच्या हत्येचं कारण ठरलं.काही दिवसांपासुन संतोष चौहानचा शोध पोलिसांकडून सुरू होता.पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली.त्यावेळी संतोष गव्हाच्या टाकीत लपुन बसलेला आढळुन आला.त्याच्या हातात पिस्तुल होतं.

 

पोलिसांनी आरोपी संतोषला अटक केली आहे.त्यानं एसडीओपींकडे हत्येची कबुली दिली.मित्र राकेशची गोळी झाडून हत्या केल्याचं चौहाननं सांगितलं.चौहाननं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सिंध नदीच्या किनाऱ्याजवळ शोधाशोध केली.त्यावेळी तिथे राकेश रघुवंशीचा मृतदेह सापडला.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :