नगरच्या उड्डाणपुलानं घेतला ‘या’ वकीलाचा बळी !

spot_img

नगरच्या उड्डाणपुलानं घेतला ‘या’ वकीलाचा बळी !

 

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अहमदनगरला उड्डाणपूल झाला. त्यामुळे अपघातांची मालिका बंद होऊन लोकांचे जीव वाचतील, अशी नगरकरांची भोळीभाबडी आशा होती. मात्र ती फोल ठरली आले. या उड्डाणपुलावर छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरु आहे. या उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास दुचाकी आणि एका अवजड वाहनाचा भीषण अपघात झाला.

 

या अपघातात नगरच्या लेबर कोर्टाचं कामकाज पाहणारे प्रसिध्द विधिज्ञ ॲडव्होटेक अनिरुध्द रामचंद्र टाक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या उड्डाणपुलावरच्या एका वळणावर हा अपघात झाला. सक्कर चौक ते अशोका हाॅटेलपर्यंतच्या तीन किलोमीटर अंतरावर हा उड्डाणपूल आहे.

 

 

यापूर्वी उड्डाणपुलाअभावी अवजड वाहतुकीमुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आता उड्डाणपूल झाल्यानं अपघात कमी होतील, असं सर्वांना वाटलं होतं. मात्र पुन्हा अपघात होत आहेत. ॲडव्होकेट टाक यांचा अपघाती मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

दरम्यान, या अपघाताप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्युच्या घटनेची नोंद केली आहे. ॲडव्होकेट टाक यांच्या मृतदेहाचं नगरच्या सिव्हील हाॅस्पिटलमध्ये पोस्टमार्टेम करण्यात आल्यानंतर नगरमध्ये अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

ट्रॅफिफ पोलिसांचं नियोजन कोलमडलं !

 

नगरच्या उड्डाणपुलावरुन फक्त हलक्या वाहनांनाच प्रवेश द्यायला हवाय. उड्डाणपुलाखाली पूर्वीप्रमाणं अवजड वाहतूक सुरु ठेवण्याची आवश्यकता आहे. मात्र नगरच्या उड्डाणपुलावरुन जड आणि हलकी अशी वाहतूक सुरुच आहे. उड्डाणपुलाखालूनही अवजड वाहतूक सुरु आहे. एका अर्थानं नगरच्या ट्रॅफिक पोलिसांचं वाहतूक नियमनाचं नियोजन कोलमडल्याचं यातून स्पष्ट होत आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :