नऊ वर्षात किती आले ‘अच्छे दिन’ ? वाचा आणि या लेखांमधून जाणून घ्या … !
देशाच्या सत्तेवर येऊन मोदी सरकारला नऊ वर्षे झाली. या नऊ वर्षांच्या कालखंडामध्ये किती वेळा ‘अच्छे दिन’ आले, हे आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत. ते वाचून तुम्हीच ठरवा यापुढे म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशाची सत्ता कोणाकडे द्यायची?
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाच्या जीडीपी म्हणजे विकासदर दुप्पट झाला. सामान्य माणसाची वार्षिक कमाई दुप्पट झाली. परंतु महागाई प्रचंड वाढली. पेट्रोल, डिझेलपासून तर डाळी आणि पिठाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या.
‘मेक इन इंडिया’ मोदी सरकारने हा जो नारा लावला, त्यामागे उद्देश असा होता, की देशात तयार होणाऱ्या वस्तू बाहेरच्या देशाच्या विकायच्या. मात्र झाला मोदी सरकार निर्यात करण्याऐवजी आयातच करत आहे. मोदी सरकारच्या काळात विदेशी कर्जसुद्धा वाढलं आहे. हल्ली 25 अरब डॉलर कर्ज भारतावर वाढलं आहे.
भारतावर पूर्वी 409 अरब डॉलर कर्ज होतं. मात्र आता ते 613 अरब डॉलर पर्यंत पोहोचलं आहे. मोदी सरकार येण्याच्या अगोदर 43 कोटी लोकांकडे रोजगार होता. सध्या 41 कोटी लोकांकडे रोजगार आहे. म्हणजेच दोन कोटी बेरोजगार झाले आहेत.
भारतात सध्या 90 कोटी लोक नोकरी करण्यायोग्य आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे 45 कोटी लोकांनी नोकरी शोधायचं सोडून दिलं आहे. मोदी सरकार देशात येण्यापूर्वी बेरोजगारी 3.4 टक्के होती आता ती चक्क 8.1 टक्के आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी देशात 15.18 लाख स्कूल होते. आता त्यामध्ये घट होऊन 14.89 लाख स्कूल राहिले आहेत.
मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली. शिक्षणाचा दर्जा घसरला. बेरोजगारी वाढली. भारतावर विदेशी कर्ज वाढले. देशाची अर्थव्यवस्था डगमगली. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस खाद्य तेल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या. तर मग हेच का ‘अच्छे दिन’, अशी विचारण या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केली जात आहे.