धारावी! झोपडपट्टी नव्हे तर हजारोंच्या रोजगाराचं प्रेरणास्थान!

spot_img

धारावी! झोपडपट्टी नव्हे तर हजारोंच्या रोजगाराचं प्रेरणास्थान!

मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीची अनेकदा चर्चा होते. बाॅलिवूडलादेखील या झोपडपट्टीचं मुख्य आकर्षण राहिलंय. या परिसरात बाहेरुन झोपडपट्टी दिसते. पण या परिसरात हजारोंना रोजगार मिळवून दिला जातो. याविषयी ‘महासत्ता भारत’च्या या लेखात तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे. तेव्हा हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेख मन लावून वाचाच…!

धारावी झोपडपट्टी 5 हजार छोटे मोठे व्यवसाय आणि 15 हजार कंपन्या स्थापना 1884 सुरुवातीला खाडी दलदल नंतर दलदल नाहीशी झाली आणि दक्षिण मुंबईतल्या गरीब लोकांसह स्थलांतरित कामगारांनी धारावीत घर बांधायला सुरुवात केली इथून कामगारांना कंपनीत जाणं सोपं झालं.

उद्योग धंद्यांसाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून धारावी झोपडपट्टीत छोटे मोठे उद्योग व्यवसाय करायला सुरुवात केली. धारावीतल्या लेदर या कंपनीत तयार केलेल्या चामड्याच्या वस्तूंना परदेशातही प्रचंड मागणी आहे.

या कंपनीत चामड्यापासून चपला, बॅगा, वाॅलेट, जॅकेट अशा वस्तू तयार होतात. या व्यवसायाचं मार्केट मोठं असलं तरी कोविडचा फटका या व्यवसायालाही बसला होता. या व्यवसायामुळे अनेक कारागिरांना रोजगार उपलब्ध झालाय. धारावीत तयार झालेलं प्राॅडक्ट संपूर्ण जगभर निर्यात केलं जातं.

या कंपनीतलं लेदर ‘झारा’सारख्या लक्झरी ब्रँड्सनाही धारावीतूनच पुरवलं जातं. धारावीतल्या लेदर कंपनीत तब्बल 1 लाख 50 हजार लोकं काम करताहेत. ही कंपनी वर्षाला 300 ते 500 मिलियन डाॅलर्सचा टर्नओव्हर करते.

धारावीतली दुसरी प्लास्टिक रिसायकलिंग इंडस्ट्री. धारावीत कधीच काही फुकट जात नाही. ही इथल्या कारागिरांची खरं तर कलात्मकता आहे. मुंबई शहरात घाण, कचरा, प्लास्टिकची काहीच कमी नाही. अख्ख्या मुंबईतलं 60 टक्के टाकाऊ प्लास्टिक धारावीत रिसायकलिंग केलं जातं.

या कंपनीत 10 ते 12 हजार कामगारांना रोजगार मिळतो आहे. तिसरी आहे वॅक्स प्रिंटिंग इंडस्ट्रिज. ही धारावीतली सर्वात जुनी कंपनी आहे. धारावीत असे 40 ते 50 युनिट्स कार्यरत आहेत. वॅक्स प्रिंटिंगचा विषय तसा अवघड असतो. त्यामुळे इथं पट्टीचे कारागिर लागतात. जसं बाटिकचं प्रिंट असतं तसंच हे प्रिंटींग सुतीच्या रंगीबेरंगी कपड्यांवर केलं जातं.

बाटीकचं प्रिंटिंग करणार्‍या कारागिरांचं काम 10 तासांचं असतं आणि त्या कारागिरांना प्रत्येक दिवसाला 500 ते 800 रुपये मोबदला मिळतो. चौथी पाॅटर इंडस्ट्रिज म्हणजे कुंभार काम. धारावीतल्या मातीच्या वस्तूंनादेखील बाजारात मोठी मागणी आहे. सर्वात जास्त चांगला सिझन असतो दिवाळीचा.

दिवाळीच्या सणात या वस्तूंचा खप दुप्पट होतो. ज्या भागात हे काम चालतं, त्या भागाला धारावीतला कुंभारवाडा असं म्हणतात. घरात तयार केलेल्या मातीच्या मडक्यांपासून पणत्यांपर्यंत सर्व वस्तू इथली माणसं टोपली ठेवून विकतात. मुंबईत आलेली माणसं धारावी झोपडपट्टीला आवर्जून भेट देतात. इथली माणसं कशी कामं करतात, त्यांचं राहणीमान ते जवळून पाहतात.

मातीपासून विविध वस्तू तयार करण्याचं इथं वर्कशाॅपही चालतं. धारावीतल्या झोपडपट्टीचं अनेकांना आकर्षण असतं. यासाठी इथल्या लोकांनी टुरिझमचा व्यवसाय सुरु केलाय. या माध्यमातून तुम्हाला धारावी झोपडपट्टीचं जवळून दर्शन घडतं. धारावी ही झोपडपट्टी नाही तर छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायातून हजारोंच्या रोजगारनिर्मितीचं हे एक प्रेरणास्थान आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :