धांदरट स्वभावाची माणसं कधी काय करतील, हे काही सांगता येत नाही, एक असाच धांदरट माणूस समुद्रात मासे पकडत होता. मासे पकडत अस

spot_img

नामांकित कंपनीचा महागडा मोबाईल फोन मासे धरणाऱ्या एका धांदरट इसमाने दिला पाण्यात फेकून !

 

 

धांदरट स्वभावाची माणसं कधी काय करतील, हे काही सांगता येत नाही, एक असाच धांदरट माणूस समुद्रात मासे पकडत होता. मासे पकडत अस

 

ताना तो त्याच्या मित्राला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मासा दाखवित होता. त्याने एक मोठा मासा एका हातात पकडला होता. दुसऱ्या हातात नामांकित कंपनीचा महागडा मोबाईल होता.

 

 

या महागड्या मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पकडलेला मोठा मासा तो मित्राला दाखवत होता. मात्र मासा दाखवून झाल्यानंतर त्या धांदरट इसमानं माशाऐवजी महागडा मोबाईलच समुद्रात फेकून दिला. सुरुवातीला त्याला वाटले आपण मासाच फेकून दिला. मात्र एका क्षणात त्याच्या लक्षात आले, की आपण महागडा मोबाईल पाण्यात फेकून दिला आहे.

 

 

तो धांदरट इसम आणि त्याचा मित्र एका बोटीतून समुद्रात मासे पकडत होते मासे पकडत असताना हा इसम व्हिडिओ कॉलवर त्याच्या मित्रांना मासा दाखवत होता‌ आनंदाच्या भरात त्याने माशाऐवजी मोबाईल पाण्यात फेकून दिला‌‌ मात्र ही चूक लक्षात आल्यानंतर त्याचा मित्र खूप हसू लागला. पण ज्याने मासा समजून मोबाईल पाण्यात फेकून दिला, त्याचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला.

 

हल्ली बाजारात अनेक नामांकित मोबाईल कंपन्या वेगवेगळे आयफोन विक्रीसाठी आणत आहेत. या मोबाईल फोनमध्ये अनेक आकर्षक असे फीचर्स असतात. या मोबाईलची मेमरी खूप स्ट्रॉंग असते. या मोबाईलची फोटो क्वालिटी चांगले असते. या मोबाईलच्या किंमती एक लाख रुपयांच्या पुढे असतात.

 

 

असाच एक महागडा मोबाईल केवळ धांदरटपणामुळे समुद्राच्या पाण्यात फेकण्यात आला. मात्र त्यानंतर त्या इसमाला हसावे की रडावे असं झालं.

आजकाल मोबाईल म्हणजे माणसाचा जीव की प्राण असा झालाय. एखाद्याचा मोबाईल बिघडला तर त्याला बेचैन होतं. घरातली एखादी व्यक्ती खूप आजारी आहे, असं त्याला होतं.

 

 

क्षणाक्षणाला माणूस मोबाईलवर अपडेट चेक करत असतो. पण जर मोबाईलच हरवला किंवा धांदरटपणामुळे डोळ्यादेखत पाण्यात पडला तर संबंधित व्यक्तीची काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेली बरी.

 

मोबाईलमुळे अनेकांची कामं पटापट होत आहेत. अँड्रॉइड मोबाईलमध्ये असलेल्या इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातली माहिती एका क्लिकवर मिळत आहे. पण कधी कधी नेटवर्क स्लो झाल्यावरसुद्धा माणसं चिडतात. इथं तर एका इसमाचा महागडा मोबाईल त्याच्या चुकीमुळे समुद्राच्या पाण्यात पडला. सांगता येईन आणि सहनही होईना, अशी त्याची अवस्था झालीय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :