दोन हजार रुपयांच्या संभाव्य नोटबंदीचा सराफ बाजारावर देखील होणार परिणाम !

spot_img

दोन हजार रुपयांच्या संभाव्य नोटबंदीचा सराफ बाजारावर देखील होणार परिणाम !

ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांच्यामुळे आता सराफ बाजारात अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळत आहे. २००० च्या नोटबंदीचा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा सुवर्णनगरीवर सुद्धा परिणाम झाला आहे.

 

भविष्यात नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा बँकेत बदलविण्याचा त्रास वाचवण्यासाठी नागरिक त्या दोन हजारांच्या नोटांचा सोन्यामध्ये खरेदी करून गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचा साहाजिकच सराफ बाजारावरसुद्धा परिणाम होणार आहे.

दोन हजारांची नोटा बदलाव्या साठी लोकांचा सोने खरेदीवर वळतील, त्यामुळे परिणामी सोन्याचे भाव वाढतील, असं मत सराफ व्यवसायिकांनी बोलताना व्यक्त केलं. थोडासा त्रास होईल मात्र शासनाचा हा निर्णय निश्चितच चांगला असून यामुळे काळा पैसा बाहेर पडेल असेही सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे.

बँकेत नोटा बदलण्याचा जो त्रास होणार आहे तो त्रास वाचवण्यासाठी त्या नोटाच्या बदल्यात सोने खरेदी करून घेतली, सोन खरेदीमुळे ती एकप्रकारे गुंतवणूक आहे.. शासनाने निर्णय अत्यंत घाईघाईत घेतला त्यामुळे त्याचा निश्चितच सर्वसामान्य जनतर परिणाम होणार आहे असं मत सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :