दोन हजारची नोट घेऊन येणाऱ्याला सोने-चांदी महाग ; ग्राहकांची पावलं वळताहेत सराफ बाजाराकडे !

spot_img

दोन हजार रुपयांच्या गुलाबी नोटांनी सराफा बाजारचा रस्ता धरला आहे. केवळ दोन हजारांच्याच नोटा घेऊन येणाऱ्या ग्राहकांना सोने आणि चांदी महागात पडत आहे. या नोटांचे ओझे सांभाळण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागत आहे.

सध्या डॉलर वरचढ ठरल्याने सोने-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. सोने-चांदीला एका ठराविक भावाच्या पलीकडे उडी मारता येत नसल्याचे दिसून येते. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये चढउताराचे सत्र सुरु आहे. भावात मोठी वाढ न झाल्याने ग्राहकांची पावले सराफा बाजाराकडे वळली आहेत.

मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,342 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 55,273 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. goodreturns नुसार आज 22 कॅरेटचा भाव 56,150 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, सकाळच्या सत्रात भावात कोणताही बदल झालेला नाही.

मंगळवारी 22 कॅरेटच्या भावात 290 रुपयांची घसरण झाली होती.24 कॅरेट सोन्यात 310 रुपयांची घसरण झाली होती. त्यापूर्वी 20 मे रोजी अनुक्रमे 500 रुपयांची आणि 550 रुपयांची दरवाढ झाली होती.

24 कॅरेट सोन्याचा भाव 60,342 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,100 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,273 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,257 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :