दोन बायका आन् त्या समोरासमोर आल्या की मग ‘त्याची’ फजिती ऐका !
आपल्या देशात एक कायदा आहे, ज्या कायद्यानुसार एकदा लग्न झाल्यावर परत दुसर्यांदा लग्न करता येत नाही. मात्र अनेक जण या कायद्याचं फारसं मनावर घेतच नाहीत. पहिली पत्नी असताना दुसरीवर जीव जडला, की प्रेम करतात आणि त्या दोघी कधी ना कधी समोरासमोर येतातच. मग काय फजिती होते, ती अनेकांनी अनुभवली असेलच.
उत्तरप्रदेशच्या मुरादाबादमध्ये अशाच एका दोन बायकांचा दादला म्हणजे नवरा असलेल्या इसमाची फजिती झाली. त्याचं लग्न झालं असून पहिल्या पत्नीपासून त्याला तीन मुल झाली आहेत. मात्र ही माहिती त्यानं दुसर्या महिलेपासून लपवून ठेवत तिच्याशि लग्न केलं.
अनेक दिवस झाले, नवरा तिला तिच्या सासरी का नेत नाही, असा प्रश्न त्या दुसर्या पत्नीला पडला. तो तिला अनेक महिन्यांपासून भाड्याच्या खोलीत ठेवत होता. ती कंटाळली आणि सासरी नेण्याबद्दल हट्ट धरायला लागली. मात्र हा गडी नेहमीच वेळ मारुन नेत होता. शेवटी त्या महिलेची सहनशीलता संपली.
त्या महिलेनं दिली पोलिसांत तक्रार. मग कशाला विचारता, अहो पोलिसांनीच त्याच्या बायकांना समोरासमोर आणलं. त्या इसमाची इतकी फजिती झाली, की कुठं तोंड लपवू आन् कुठं नको, अशी त्याची अवस्था झाली.
शेवटी त्या दोघींनीच पोलिसांसमोर नवर्याचं वाटपच करुन टाकल. ते वाटप असं झालं, दोन बायकांचा नवरा असलेला तो इसम पहिल्या बायकोकडे तीन दिवस आणि दुसर्या बायकोकडे तीन दिवस राहणार आणि उरलेल्या एक दिवसांत त्याच्या मर्जीनुसार जीवन जगणार.
अर्थात दोन्ही बायकांनी एक विचार करुन त्या इसमाबरोबर संसार करायचं ठरवलं. हे असं सहजा सहजी घडत नाही. दोन बायका एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे हे तसं खूप दुर्मिळ उदाहरण आहे. आता त्या इसमाला दोन्ही बायकांना त्याच्या कमाईतला निम्मा खर्च द्यावा लागणार आहे.
‘दोन बायका फजिती ऐका’ या मराठी चित्रपटात प्रसिध्द अभिनेते अशोक सराफ यांनी हा अप्रतिम असा अभिनय केलेला आहे. प्रत्यक्षात दोन बायका असलेल्या इसमाचे दोन बायकांमुळे काय धावपळ होते, त्याला किती मोठी सर्कस करावी लागते, हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आलेलाच असेल.