दुचाकी चोराला पोलिसांनी केलं जेरबंद ; अहमदनगर कारवाई !

spot_img

मोटार सायकलची चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं जेरबंद केलं. या आरोपीला पोलिसांनी 75 हजार रुपये किंमतीच्या होंडा युनिकॉर्न कंपनीच्या मोटार सायकलसह जेरबंद केलं. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही दमदार कारवाई केली.

 

दिनांक 27/04/23 रोजी फिर्यादी  बाबासाहेब भिकाजी पाटोळे (वय 55, रा. आश्वी बुा, ता. संगमनेर) यांनी त्यांचे राहते घरासमोर लावलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटार सायकल अनोळखी इसमांनी चोरुन नेली होती. सदर घटने बाबत आश्वी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. 107/2023 भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/ दिनेश आहेर (स्थागुशा, अहमदनगर) यांना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/  आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/ रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरखान शेख, पोकॉ/रोहित येमुल, जालिंदर माने व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या.

पथकातील पोलीस अंमलदार हे शिर्डी, राहाता परिसरात फिरुन मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असताना पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शुभम काळे, गणेश नगर, ता. राहाता याने साथीदारांचे मदतीने चोरी केलेली होंडा युनिकॉर्न मोटार सायकल नेवासा फाटा येथे विक्री करण्यासाठी येणार आहे. आता गेल्यास मिळुन येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

पोलीस निरीक्षक आहेर यांनी ही प्राप्त माहिती लागलीच पथकास कळवून पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने तात्काळ नेवासा फाटा येथील मुकिंदपुर कमानी जवळ रोडच्या कडेला सापळा लावून थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम होंडा युनिकॉर्न गाडीवर येताना दिसला.

पोलिसांनी त्याला थांबवून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव गौरव राजेंद्र धनवटे (वय 21, रा. गणेशनगर, ता. राहाता) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे ताब्यातील होंडा युनिकॉर्न मोटार सायकल बाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदारासह आश्वी बुा येथुन सदर मोटार सायकल चोरी केली असुन विक्री करण्यासाठी घेवुन जात असले बाबत माहिती दिली.  75,000/- रु. किंमतीचे होंडा युनिकॉर्न मोटार सायकलसह ताब्यात घेवुन आश्वी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास आश्वी पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपीचे इतर साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.

सदरची कारवाई  ओला (पोलीस अधीक्षक, अहमदनगर),  स्वाती भोर (अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर) व संजय सातव (उविपोअ संगमनेर विभाग) यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :