दिवास्वप्न वाटणारी फ्लाईंग कार अर्थात उडती कार कशी असेल ? माहिती नीट वाचा आणि जाणून घ्या !
फ्लाइंग कारच्या लॉन्चिंगविषयी फार चर्चा होत आहे. अनेकांना ही योजना केवळ स्वप्नं वाटतं. परंतू आता खरंच हे स्वप्नं सत्यात उतरणार आहे. 2023 पर्यंत उडणाऱ्या कार्स बाजारात (flying cars in the future) येण्याची शक्यता आहे. त्यामुळं ट्रॅफिक जॅमपासून लोकांची सुटका होणार आहे. कारण आता अनेक कंपन्या अशा प्रकारच्या कार तयार करण्यावर (flying car concept) काम करत आहेत.
LuftCar कंपनी ही अमेरिकेत उडणारी कार तयार करण्याच्या योजनेवर काम सुरू केलं आहे. LuftCar कंपनी उडणाऱ्या या कारमध्ये सहा प्रोपेलर देणार आहे. त्या कारचा वेग हा 350KMPH प्रतितास असणार आहे. त्याचबरोबर ही कार जमिनीवरही चालेल आणि जमिनीपासून चार हजार फुटांच्या उंचीवरही उडणार आहे.
LuftCar ची फ्लाइंग कार ही हाइड्रोजन इंधनावर चालणार असून त्यात पाच लोकांच्या बसण्याची व्यवस्था असेल. त्याची किंमत ही 26 लाखांच्या आसपास असणार आहे. त्यामुळं या कारला फक्त श्रीमंत लोकांनाच खरेदी करता येईल, असं बोललं जात आहे.
LuftCar कंपनीचे सीईओ संत सत्य यांनी याविषयी बोलताना सांगितलं, की गर्दी असलेल्या शहरांमध्ये या कारचा वापर करणं फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर या कारच्या माध्यमातून लांब पल्याचा प्रवास करता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.