मला पोलीस संरक्षण द्या! दिपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्डशी संबंधाचा पुरावे जाहीर करतो..
सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांचा गौप्यस्फोट!
अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या अडचणीत वाढ…
सिनेअभिनेत्री आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या आणि आता बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेनेच्या वाटेवर असणाऱ्या दिपाली सय्यद भोसले यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याचा भाऊ इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला यांच्या सोबत आर्थिक संबंध असून दीपाली सय्यद यांच्या दिपाली सय्यद भोसले सामाजिक फाउंडेशच्या माध्यमातून आर्थिक संबंध आहेत.
दिपाली सय्यद अनेक वेळा दुबई जातात त्याची चौकशी केली तर त्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल याचे सर्व पुरावे माझ्याकडे असून मला संरक्षण द्या मी राज्य शासन आणि पोलिसांना पुरावे देऊ शकतो, असा गौप्यस्फोट दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी नगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय.
‘कुठल्याही क्षणी दिपाली सय्यद आणि राज्यपाल यांच्या कार्यकर्त्यांपासून माझा खून होऊ शकतो. असा धक्कादायक आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत कोविड योद्धा पुरस्कार प्रदान केले हा कार्यक्रम दिपाली सय्यद यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आला होता.
त्यावेळी सर्व कोविड योध्यांना पन्नास हजार रुपयांचे चेक देण्यात आले होते. मात्र हे चेक खोटे असून 50 लोकांना दिलेले चेक पैकी एकही चेक बँकेत जाऊन पैसे काढण्या लायक नसल्याने दिपाली सय्यद आणि राज्यपालांनी कोविड योध्याची फसवणूक केली आहे.
सांगलीमध्ये कोविड काळात सामुहिक विवाहाचे आयोजन केले होते त्या ठिकाणी नाव नोंदणी न झाल्याने लग्न झालेले आणि ज्यांना मुले आहेत अशा दाम्पत्याची लग्न लावली गेली आहेत या कार्यक्रमाला राज्यपालांनी उपस्थिती लावली होती.
अयोध्या दौऱ्यात राज ठाकरेंची हत्या करायची होती त्याचा कट दिपाली सय्यद आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी आखला होता. त्यासाठी अनेक वेळा दिपाली सय्यद दिल्लीला गेल्या होत्या दिपाली सय्यद यांनी जवळपास 17 ते 18 दिल्लीची वारी केलेली होती असा गंभीर आरोपही भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
माझ्या संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी. मी 30 जानेवारी रोजी पुराव्या सहित माहिती देतो, असं ते म्हणाले.