दावोस येथे पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला मिळाली 45,900 कोटी रूपयांची गुंतवणुक

spot_img

दावोस येथे पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला मिळाली 45,900 कोटी रूपयांची गुंतवणुक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील अनेक उद्योग महाराष्ट्र बाहेर गेलेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. यातच स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये वर्ल्ड इकाॅनॉमिक फोरमच्या विद्यामाने आतंरराष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास 45,900 कोटी रूपयांची गुंतवणुक केल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत आणि काही अधिकारी दावोस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेले आहेत. पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी विविध उद्योगांमध्ये 45,900 कोटी रूपयांची गुंतवणुक केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे जवळपास 10, 000 हजार तरूणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती देखील उदय सामंत यांनी दिली आहे.

दावोसमध्ये महाराष्ट्राने  Greenko Energy Projects Pvt.Ltd या कंपनीत 12 हजार कोटी रूपयांची गुंतवणुक,  Berkshire Hathaway Home Services Orenda India यामध्ये 16 हजार कोटी रूपयांची गुंतवणुक, ICP, Investments/Indus Capital  या कंपनीत 16 हजार कोटी, Rukhi Foods 480 कोटी रूपये. Nipro Pharma  Packaging India Pvt.Ltd. या कंपनीत 1 हजार 650 कोटी रूपयांची गुंतवणुक केल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांच्यासह प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, टी. कृष्णा श्रे. एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते. आजपासून दावोस येथे परिषदेला सुरूवात झाली आहे. जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी वर्ल्ड इकाॅनॉमिक फोरम महत्वाची मानली जात आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :