दवाखान्यात जाण्यापूर्वी शेवटचा उपाय समजून करा हा उपाय, कसलाही खोकला कोरडा, ओला आणि छातीतील कफ एका मिनिटांत चुटकीत गायब …..!!

spot_img

मित्रांनो, ऋतू बदलला, सीझन बदलला, वातावरणात बदल झाला की लहान मुलांच्या तब्येती बिघडायला सुरू होतात. त्यांना सर्दी, खोकला आणि ताप तसेच धाप लागणे श्वास घेण्यास त्रास होणे या समस्या होतात. अशावेळी बऱ्याच घरातील लोक घाबरून जातात. त्यांना काय करावं हे सुचत नाही. लहान मुलांच्या काळजीने त्यांचा जीव घाबराघुबरा होतो. तर अशा समस्यांसाठी आपण आज एक घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत आणि मित्रांनो तुमच्या घरी वयोवृद्ध व्यक्ती घरी असतील. त्यांना जर सर्दी खोकला होत असतो. तसेच खोकला हा सर्वांनाच ऋतू बदलला की होत असतो.

 

तर हा उपाय सर्वांसाठी करता येतो. हा घरगुती आयुर्वेदिक उपाय आपण कसा करायचा आहे हे आज पाहणार आहोत आणि मित्रानो खोकला सुरू झाला की, खोकून आपल्या घशात दुखते. छातीत दुखते. काही खावंसं वाटत नाही आणि झोपही लागत नाही. यामुळे स्वभाव चिडचिडा बनतो रात्री झोप लागत नाही.

 

या सर्व गोष्टीतून, समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी आपण दवाखान्यात लगेच जाण्याची आवश्यकता नाही. आज जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत. या उपायाने तुमचा खोकला एक मिनिटात थांबेल.

 

चला तर पाहूया हा उपाय कसा करायचा आहे.तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रमुख जे पदार्थ लागणार आहेत एक म्हणजे विड्याचे पान आणि दुसरा म्हणजे ओवा आणि थोडीशी खडीसाखर. एक विड्याचे पान यालाच खाऊचे पान म्हणतात. काही ठिकाणी नगिनीचे किंवा नागवेलीचे पान या नावाने ओळखले जाते. तर हे पान आपल्याला सहजासहजी पान टपरीवर देखील उपलब्ध होते.

 

ही सर्व पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत व कोरडी करावीत. सुरुवातीला त्याचे देठ कट करून घ्यावेत आणि देठ कट करून घेतल्यानंतर पान उलटे करून त्यामध्ये एक छोटा चमचा ओवा घालायचा आहे.

 

मित्रांनो, ओवा हा तिखट असल्यामुळे आणखीन एक उपयुक्त पदार्थ घालू शकतो तो म्हणजे मध. यामुळे या पानाची आणखीन चव व आयुर्वेदिकता वाढेल. विड्याचे पान मधासोबत खाल्ल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपला खोकलादेखील थांबण्यास मदत होईल.

 

तर अशाप्रकारे पानाचा विडा तयार करायचा आहे. आणि सकाळी उपाशी पोटी याचे सलग 3 दिवस सेवन करायचे आहे. तर मित्रांनो हे जे विड्याचे पान आहे या विड्याच्या पानांमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, थायमिन इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच पानात असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे तोंडातील रोगाणू बॅक्टेरियाशी निगडीत इतर रोगांपासून आपला बचाव होतो.

 

त्याचप्रमाणे ओव्यामध्ये अँटी ऑक्‍सिजन मोठ्या प्रमाणात असतात. ओवा हा उष्ण व पाचकदेखील आहे. ओव्यामध्ये थायमॉल नावाचा जो घटक आहे. तो आपल्या छातीमध्ये साठलेला कफ पूर्णतः पातळ करून छातीतील कफ नाहीसा करण्यासाठी आपणास मदत होते.

 

मित्रांनो जरी तुमच्याकडे विड्याचे पान नसेल व फक्त ओवादेखील खाल्लात तरी तुमच्या घशातील इन्फेक्शन पूर्ण बरे होण्यास मदत होईल. तर अशाप्रकारे विड्याचे पान तुम्ही सेवन केल्यास तुमचा कसलाही भयंकर खोकला नक्कीच संपुष्टात येईल. तर मित्रांनो असा हा सोपा आणि घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :