‘त्या’ प्रयोगशील तरुणानं 8 महिन्यांत 40 किलो वजन कमी केलंय !

spot_img

‘त्या’ प्रयोगशील तरुणानं 8 महिन्यांत 40 किलो वजन कमी केलंय!

‘त्यानं’ चालण्यावर अधिक लक्ष दिलं. ‘तो’ पहाटे 4:45 वाजता उठून 8-10 किमी धावण्यासाठी जातो, त्यानंतर 108 सूर्यनमस्कार आणि त्यानंतर योग आणि प्राणायाम, मग, 3 तासांच्या विश्रांतीनंतर वेट ट्रेनिंग आणि फक्शनल ट्रेनिंग, हिट HIIT आणि ‘तो’ जिममध्ये जायचा.

 

एवढंच नाही यानंतर संध्याकाळी 2 ते 3 तासांपेक्षा जास्त ‘तो’ बॅडमिंटन खेळायचा. ‘त्यानं’ वर्कआउटमध्ये एकूण 7-8 तास गुंतवले. यामुळे जंक फूडकडे त्याचं लक्ष गेलंच नाही आणि ‘त्यानं’ 8 महिन्यांत 40 किलो वजन कमी केलं. या प्रयोगशील तरुणाचं नाव आहे, विवेक सचिन गोडबोले !

 

शरिराच्या वाढत्या वजनाच्या समस्येवरुन अनेक जण हैराण परेशान आहेत. मात्र या समस्येवर योग्य आणि कुशल मार्गदर्शनासह शारिरीक कसरत न करता काही जण डाएट Daieat करुन वजन कमी करण्याच्या फंदात पडतात. तर काही जण सप्लिमेंट घेऊन वजन वाढवतात. मात्र व्यायामाशिवाय शरिराचं वाढलेलं वजन कमी होत नाही, हेच विवेकनं कृतीद्वारे दाखवून दिलंय.

 

विवेक वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेस पुन्हा रुळावर आणण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. परंतू त्याला लिगामेंटचा त्रास झाल्यामुळे ध्येय गाठणं अत्यंत कठीण झालं. याव्यतिरिक्त त्याला खाण्याची आवड असण्याने गोष्टी अधिक आव्हानात्मक होत गेल्या. विवेकला जाणावणाऱ्या त्रासाने त्याला आपला फिटनेस प्रवास पुन्हा सुरू करण्यास प्रवृत्त केले.

 

त्याला खेळ खेळताना वजनाचा त्रास व्हायचा. यापूर्वीही विवेकने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पण ते त्याला शक्य झाले नाही. याला कारणं अनेक होती. त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे लिगामेंटतचा होणारा त्रास. यामुळे विवेकचं वजन कमी झालेलं त्यापेक्षा अधिक वाढलं. याशिवाय, फूडी असणं आणि जंक/स्ट्रीट फूडमध्ये मन गुंतल्यामुळे वजन कमी करण्याचा प्रवास थोडा लांबत होता.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :