… तेव्हाच उद्धव ठाकरेंना बनायचे होते मुख्यमंत्री ; आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट !

spot_img

… तेव्हाच उद्धव ठाकरेंना बनायचे होते मुख्यमंत्री ; आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट !

काल अर्थात शनिवारी (दि. २०) बीड जिल्ह्यात झालेली ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा फ्लॉप झाली असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या यात्रेत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते जास्त असल्याचं आमदार राणे यांनी म्हटले आहे.

सभेच्या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या होत्या. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून कार्यकर्ते बोलावून घेतले, अशी खिल्लीदेखील आमदार राणे यांनी उडवली आहे.

दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून म्हटले आहे, की शकुनी मामाचा शो फ्लॉप झाला. बीडमध्ये झालेल्या या सभेला ठाकरे गटाचे नेमकं किती कार्यकर्ते होते ? की सगळेच कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते ? सभेची वेळ पाच असताना सभा रात्री आठ वाजता सुरू झाली. अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीला फोन करुन कार्यकर्ते बोलवून घेतले.

आमदार नितेश राणे यांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. आता आमदार राणे यांच्या या ट्विटवर ठाकरे गटाचे नेमकं काय उत्तर येतं, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतानाच मुख्यमंत्री व्हायचे होते ती त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळेच त्यावेळी सत्ता गेली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :