तुम्ही जनधन फॉर्म भरला का ; नसेल भरला तर ही माहिती घ्या जाणून !

spot_img

तुम्ही जनधन फॉर्म भरला का ; नसेल भरला तर ही माहिती घ्या जाणून !

पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी झिरो बॅलन्स अर्थात बँक खात्यावर ठराविक रक्कम हवी, अशी अट लागू होत नाही. भारतातला कोणताही नागरिक जनधन अकाउंट कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत उघडू शकतो. यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, ते आपण जाणून घेऊयात.

पंतप्रधान जनधन योजना किंवा पीएम जीडी वाय या योजनेसाठी तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृल बँकेत जाऊन झिरो बॅलन्स खातं उघडू शकता. यासाठी बँक मित्र किंवा अधिकृत संस्थेमार्फत तुम्हाला एक फॉर्म दिला जातो. तो योग्य आणि काळजीपूर्वक भरून त्या फॉर्म सोबतजी काही कागदपत्रं जोडावयाची आहेत, त्या कागदपत्रांसह तो फॉर्म तुम्हाला बँकेत जमा करायचा आहे.

कसं असतं हे जनधन खातं, त्याविषयी थोडक्यात…

जनधन या बँक खात्यावर तुम्ही जी रक्कम टाकता, त्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळतं. या खात्यावर ठराविक रक्कम ठेवण्याची कोणती अट नाही. जनधन खात्यामुळे तुम्हाला एक लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण मिळतं. प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत जे खातं तुम्ही उघडता, त्या खात्यामधून तुमच्या नातेवाईकांना ३० हजार रुपयांचा विमा मिळू शकतो.

कोणाला होऊ शकतो या खात्याचा फायदा ?

पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडल्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपये प्रतिमाह मिळू शकतात. यासाठी अर्जदाराचे वय 65 वर्षे असले पाहिजे. त्याचं खातं सहा महिन्यापूर्वीच असायला हवं. हे खाते उघडताना तुमच्याकडे रक्कम शिल्लक नसल्यास तुम्हाला दहा हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळतो. ही रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :