तुम्ही किती शिकला आहात ? ग्रॅज्युएट ? पोस्ट ग्रॅज्युएट ? अहो, हे तर काहीच नाही ! ‘या’ व्यक्तीने मिळविल्यात तब्बल वीस पदव्या !

spot_img

तुम्ही किती शिकला आहात ? ग्रॅज्युएट ? पोस्ट ग्रॅज्युएट ? अहो, हे तर काहीच नाही ! ‘या’ व्यक्तीने मिळविल्यात तब्बल वीस पदव्या !

 

तुमचं आमचं शिक्षण कुठपर्यंत ?ग्रॅज्युएशन ? पोस्ट ग्रॅज्युएशन? फार फार तर पीएचडी, एम फिल वगैरे वगैरे… पण हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल, की या व्यक्तीने तब्बल वीस पदव्या मिळवल्या आहेत. या व्यक्तीचे नाव आहे डॉक्टर श्रीकांत जिचकार. तब्बल 42 विद्यापीठांमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता.

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील आणि भारत देशातील मुले, मुली ही दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी, एम फील इथपर्यंत शिकली, की त्यांना खूप जास्त शिकल्यासारखं वाटतं.

एवढं शिक्षण झालेल्यांना शिक्षणाचा खूप अभिमान येतो. ते स्वतःच्याच आगळ्या वेगळ्या विश्वात असतात. विशेष म्हणजे अशा लोकांना प्रचंड गर्व असतो. मात्र हे सारे गर्विष्ठ लोक डॉक्टर जिचकार यांच्यासमोर क्षुल्लक आहेत, कस्पटासमान आहेत.

डॉ. जिचकार यांच्याकडे वैद्यकीय डॉक्टरची पदवीदेखील होती. त्यांच्याकडे कायद्याची पदवीही होती. शिवाय त्यांनी आयएएसची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. यात नवल म्हणजे. अशी व्यक्ती फक्त भारतातील आहे.

डॉ. जिचकार यांना देशातील सर्वात शिक्षित व्यक्ती म्हटले जाते. भारतात सर्वाधिक शिक्षित व्यक्ती म्हणून लिम्का बुक पुरस्कारासह त्यांना गौरान्वित करण्यात आलं होतं.

अति उच्चशिक्षित व्यक्ती असलेले डॉ. जिचकार हे भारताचे भूषण आहे. अशा व्यक्तीचा सर्वजण आदर करतात. भारतात बनावट पदव्या किंबहुना पैसे देऊन पदव्या प्राप्त करणारे महाभाग अनेक आहेत. मात्र कठोर मेहनत करून शिक्षण पूर्ण करून तब्बल वीस पदव्या संपादन करणे वाटते तितकं सोपं नाही.

आपल्याकडची जुनी माणसं म्हणतात, की हल्लीच्या युवकांसमोर आदर्श नाही. मात्र डॉक्टर जिचकार यांच्यासारखा आदर्श आपल्या भारतातल्या मुलांना शोधूनही सापडणार नाही. एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे तर वीस पदव्या त्यांनी संपादित केल्या. हे सार करत असताना त्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले असेल, किती वेळा अपमान सहन करावा लागला असेल, याची हल्लीच्या तरुणांनी कल्पना करायला हवीय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :