तुम्हाला ‘लिफ्ट करा दें’ या लोकप्रिय गाण्याचे गायक आठवताहेत ?

spot_img

तुम्हाला ‘लिफ्ट करा दें’ या लोकप्रिय गाण्याचे गायक आठवताहेत ?

हो, बरोब्बर तेच ! अदनान सामी ! अहो, त्यांनी 100 किलो वजन कमी केलंय !

घ्या जाणून, यासाठी काय केलंय अदनान सामींनी !

अदनान सामी हे गायन विश्वातल्या लोकप्रिय नावांपैकी एक आहे. अदनानची गाणी आवडत नसतील अशी क्वचित एखादी व्यक्ती असेल. आपल्या गाण्यांसोबतच अदनान त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळेही बराच चर्चेत होता. एकेकाळी त्याचं वजन तब्बल 230 किलो असायचं. मात्र आज बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.

अदनानने वजन घटवल्यानंतर जेव्हा सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी त्यावेळी असा अंदाज वर्तवला की, अदनानने सर्जरी करून आपलं वजन कमी केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अदनानने या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे.

काही काळापूर्वी अदनानने 230 किलोतून 130 किलो वजन कमी करून सर्वांना थक्क केलंय. अदनानने इतकं वजन कसं काय घटवलं, असा प्रश्न अनेकांना पडत होता. तर काहींना वाटलं की, अदनाने लिपोसक्शन सर्जरी करून आपलं वजन कमी केलं. यावरून बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र आता अदनानने स्वत: स्पष्ट केलंय की त्याने कोणत्याही सर्जरीच्या मदतीने वजन कमी केलं नाही.

अदनान म्हणाला, “मी माझं वजन कसं कमी केलं, यावरून अनेकांनाच प्रश्न पडला होता. लोकांना वाटलं की मी सर्जरी केली, लिपोसक्शन केलं. मात्र वजन कमी करण्यासाठी मी कुठल्याही प्रकारची सर्जरी केली नव्हती.”

“माझं वजन 230 किलो होतं आणि लंडनमधल्या एका डॉक्टरने मला अल्टीमेटम दिला होता. त्यांनी मला म्हटलं की ज्या पद्धतीने तू तुझं आयुष्य जगतोय, त्यावरून पुढील सहा महिन्यात तुझ्या आई-वडिलांना तू एका हॉटेलच्या रुममध्ये मृत दिसलास तर मला आश्चर्य वाटणार नाही. हे सर्व माझे वडील ऐकत होते. त्या संध्याकाळी त्यांच्यात आणि माझ्यात भावनिक संवाद झाला होता”, असं त्याने पुढे सांगितलं.

“तुला आतापर्यंत जे काही सहन करावं लागलं, त्या सर्व परिस्थितीचा सामना मी केला आहे. मी तुझ्या प्रत्येक सुखादु:खात सोबत आहे. मी नेहमीच तुझा हात धरला आणि कधीच तुझ्याकडून कोणती गोष्ट मागितली नाही. मात्र माझी फक्त एकच विनंती आहे की, माझ्या हातून तुझं दफन मी करू शकत नाही. तुझ्या हातून माझं दफन झालं पाहिजे. कोणत्याही वडिलांवर आपल्या मुलाला दफन करण्याची वेळ येऊ नये”, असं अदनानने वडील त्या संध्याकाळी त्याला म्हणाले.

वडिलांचं हे विधान ऐकताच अदनानने वचन दिलं की तो वजन कमी करण्यासाठी हरएक प्रयत्न करणार. “मी टेक्सासला गेलो आणि तिथे मी माझ्यासाठी एक न्युट्रिशनिस्ट शोधली. त्यांनी माझं संपूर्ण लाइफस्टाइल बदललं. त्यांनी मला सांगितलं की मला आयुष्यभर तीच लाइफस्टाइल फॉलो करायची आहे”, असं अदनाने सांगितलं.

अदनानने 2001 मध्ये ‘तू सिर्फ मेरा मेहबूब’ या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याची अनेक गाणी सुपरहिट झाली. ‘भीगी भीगी रातों में’, ‘लिफ्ट करा दे’, ‘तेरा चेहरा’, ‘कभी तो नजर मिलाओ’ यांसारख्या त्याच्या गाण्यांचा एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण झालाय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :