तुम्हाला माहित आहे का जळगाव जिल्ह्यात सोने आणि चांदीचे दर काय आहेत ते ? 

spot_img

तुम्हाला माहित आहे का जळगाव जिल्ह्यात सोने आणि चांदीचे दर काय आहेत ते ? 

जळगावमध्ये सोने बाजारात आज सोने खरेदीला ग्राहकांची सुवर्ण पेढ्यांमध्ये मोठी गर्दी झाली आहे. सोन्याच्या दरात 700 रुपयांनी तर चांदीच्या दरात 700 रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव हा आज 59 हजार 900 तर चांदीचा भाव 70 हजार 300 रुपये प्रति किलो गेला आहे.

गुरुपुष्यामृत योगनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरल्याने सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. दुसरीकडे दोन हजाराची नोट बंद झाल्यावर ही नोट सराफ बाजारात चालवून याचा उपयोग करून घेताना ग्राहक सोनं खरेदी करत आहेत.

पाच दिवसांपूर्वी उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात आता जळगावात दोन दिवसांत 2 हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी 70 हजार 300 रुपये प्रति किलोवर दर पोहोचले आहेत. सोन्याच्या भावातही दोन दिवसांत 1 हजार रुपयांची घसरण होऊन ते 59 हजार 900 रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :