तुम्हाला पैशांची तंगी जाणवते का ?मग उत्तराखंडच्या ‘या’ अभ्यासू साधूचा सल्ला ऐकाच !
हल्ली प्रत्येकालाच पैशांची चणचण भासते. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला पैशांच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. मात्र दुसरीकडे श्रीमंत लोकांनी या देशातला पैसा एकत्र साठवून स्विस बँकेत ठेवला आहे. त्यामुळे खरं तर ही गंभीर समस्या निर्माण झाली. त्यामुळे मध्यमवर्गीय तसेच दारिद्ररेषेखालील अनेकांना पैशांच्या तंगीला सामोरे जावे लागते.
ही जी समस्या आहे, या समस्येवर उत्तराखंडचे निम करोली बाबा यांनी अतिशय चांगला आणि सुयोग्य असा उपाय सांगितलेला आहे. उत्तराखंड भागातल्या नैनिताल जिल्ह्यात कैंची धाम आहे. या धामाचे करोली बाबा हे अत्यंत अभ्यासू आणि तपस्वी साधू होऊन गेले. त्यांनी तुम्हाला आम्हाला अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे.
करोली बाबांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला आम्हाला पैशांच्या तंगीला जर सामोरे जावत जावे लागत असेल तर यावर उपाय म्हणून बाबांनी काही मौलिक सल्ले आपल्याला दिले आहेत. ते म्हणतात, की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, ते श्रीमंत नाहीत. मात्र ज्यांच्याकडे योग्य प्रमाणात पैसा आहे आणि तो पैसा कुठे खर्च करायचा याची त्यांना जाणीव आहे, ते खरे श्रीमंत आहेत.
आपल्याकडे असलेल्या पैशांमधून काही प्रमाणात योग्य अशा मंदिरांना, जे वैदिक धर्माच्या प्रचार प्रसार करतात, अशा संस्थांना जर हा पैसा दान केला तर तो पैसा वाढतो, असे या करोली बाबांचं मत आहे.
पैसा ही सतत संपणारी गोष्ट आहे. त्यामुळे तो पुन्हा कसा कमावता येईल, याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. योग्य मार्गाने पैसा जर कामाला तर तो टिकतो. आज समाजातल्या अनेकांकडे खूप पैसा पडून आहे. काहींनी वाम मार्गाने दुसऱ्यांना फसवून, लुबाडून पैसा गोळा केला आहे आणि तो पैसा स्विस बँकेत ठेवला आहे.
बाजारातला पैसा एकाच ठिकाणी पडून राहिल्यामुळे तुम्हाला आम्हाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. अनेक लोकांकडे रुपये आहेत. मात्र ते कुठे खर्च करायचे कसे खर्च करायचे, याचं त्यांना ज्ञान नसतं. त्यामुळे त्या पैशांचा दुरुपयोग होतो.
समाजात श्रीमंत आणि गरीब असे दोन वर्ग असताना तिसरा वर्ग उदयाला आला आहे. हा वर्ग म्हणजे दारिद्ररेषेखालील लोकांचा वर्ग. या वर्गातल्या लोकांना पैसे कमवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.
असं म्हटलं जातं, की प्रत्येकाची श्रीमंती आणि गरिबी ही त्याच्या पूर्व जन्मातल्या कर्मावर अवलंबून असते. एखाद्याने यापूर्वीच्या अनेक जन्मांत वेगवेगळ्या धार्मिक संस्थांना दान धर्म केला असेल पुण्य कमवलं असेल तर त्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असतो. मात्र त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या लोकांना तो पैसा कसा खर्च करावा, याचं ज्ञान नसल्याने त्या पैशाचा सदुपयोग होण्याऐवजी दुरुपयोग होतो.
निम करोली बाबा यांच्या मतानुसार पैसा आपण योग्य मार्गाने कमवला आणि त्याचा सदुपयोग केला, धार्मिक संस्थांना, अध्यात्मिक संस्थांना, ज्या संस्था वैदिक धर्माचे प्रचार प्रसार करतात, अशा संस्थांना जर आपण दान केलं तर आपल्याकडे पैसा येतो. कारण पैसा वाटल्याने वाढतो. त्यामुळे बाबांचा सल्ला प्रत्येकाने आचरणात आणावा.