‘तुमच्या बॅगमध्ये गांजा आहे ; बॅग तपासायची आहे’, असं म्हणत तोतया पोलीस अधिकाऱ्याने तीन लाखांवर मारला डल्ला !
पुणे जिल्ह्यात हल्ली काहीही घडू लागले आहे. विशेषतः गुन्हेगारीच्या घटनांनी सामान्य पुणेकर मेटाकुटीला
आला आहे. कोण कशा पद्धतीने एखाद्याची आर्थिक लूट करील, याचा पुण्यात काहीही नेम राहिलेला नाही.
हल्ली सायबर गुन्हेगारीच्याबरोबरच रस्ता लुटीचे प्रकारही पुण्यात वाढले आहेत. पुण्यातल्या कोंढवा भागात अलखदर अब्दुल ओमर अलहखैरी हे पायी चाललेले असताना एका तोतया पोलीस अधिकाऱ्याने त्यांना म्हटले, की तुमच्या बॅगमध्ये गांजा आहे. त्या बॅगची मला करायची आहे.
मी पोलीस अधिकारी आहे, तपासणी करायला बॅग इकडे द्या. नाही तर पोलीस स्टेशनला चला, अशी धमकी त्या तोतया पोलीस अधिकाऱ्याने दिली. अलहखैरी यांनी घाबरून त्या भामट्याच्या हातात बॅग दिली. त्या भामट्याने बॅगेतले तीन लाख रुपये हडप केले आणि तिथून पोबारा केला.
या घटनेमुळे प्रचंड संतापलेल्या यांनी
अलहखैरी याबाबत कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली. एखाद्याला आर्थिकदृष्ट्या लुबाडताना चोरटे कोणती मोडस ऑपरेंटी वापरतील, याचा काहीही नेम राहिलेला नाही.
कधी मोबाईलद्वारे एसएमएस किंवा फोन येतो, तुमच्या खात्यामध्ये एक कोटी रुपये आले आहेत, बँक खात्याची सविस्तर माहिती द्या, असं सांगून लाखो रुपये हडप करण्याचे प्रकार हल्ली पुण्यात वाढत आहेत. पुणे शहराला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा आहे. या शहरात अनेक प्रकारचे लोक राहत आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक नोकरी व्यवसायानिमित्त पुण्यात येत असतात. अशाच पायी चाललेल्या व्यक्तीला भामट्याने तीन लाख रुपयांना गंडा घातला. त्यामुळे पुण्यात कधी कुठे काय होईल, हे सांगणं अवघड आहे.