‘ती’ 20 वर्षांची आणि ‘तो’ 52 वर्षांचा ! घरच्यांचा तीव्र विरोध, तरीही दोघांनी बांधली लग्नगाठ!

spot_img

कोण कोणावर कोणत्या गुणांमुळे प्रेम करील, हे सांगणं हल्ली तसं खूप कठीण आहे. कोणाचं कोणावर प्रेम जडेल, कोण कोणाच्या प्रेमाचा कधी स्विकार करील, याबद्दलही सांगणं अवघड आहे. मात्र एका 20 वर्षांच्या मुलीला तिच्यापेक्षा 32 वर्षांनी मोठ्या असलेल्या तिला शिकविणार्‍या 52 वर्षीय शिक्षकावरच प्रेम झालं आणि दोघांच्या घरच्यांचा तीव्र विरोध असतानाही त्या दोघांनी लग्न केलं.

औरंगाबाद जिल्ह्यातली ही अनोखी प्रेमकहाणी आहे. 52 वर्षीय साजिद अली हे शिक्षक आहेत. तर 20 वर्षीय झोया नूर ही त्या शिक्षकाची विद्यार्थिनी. मात्र प्रेम आंधळं असतात, असं म्हणतात ना, ते झोया नूरच्या बाबतीत मात्र तंतोतंत खरं ठरलं.

झोया नूर ज्या काॅलेजमध्ये बीकाॅम करते, त्याच काॅलेजमध्ये साजिद अली शिक्षक आहेत. त्यांच्या शिकविण्याची जी पध्दत आहे, ती झोया नूरला खूप आवडली. त्यामुळे ती त्यांच्या इतकी प्रेमात पडली, की ती त्यांच्यासाठी अक्षरश: वेडीपिसी झाली.

झोया नूरनं एकदा साजिद अली या शिक्षकाला समक्ष भेटून, ‘मला तुम्ही खूप आवडता, मला तुमच्याशी लग्न करायचंय’, असं सांगितल. मात्र साजिद अली यांनी तिला यासाठी एक आठवडा थांबण्याचं सांगून तेवढी वेळ मागितली. विशेष म्हणजे या एक आठवड्याच्या कालावधीमध्ये साजिद अली हे शिक्षकही झोया नूरच्या प्रेमात पडले.

या लग्नाला दोघांच्याही घरच्या मंडळींचा तीव्र विरोध होता. साजिद अली यांना त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं, ‘ही मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही. तू सुंदर आहेस, सुंदर मुलीशी लग्न कर’. मात्र साजिद अली यांनी काहीही न ऐकता झोया नूर या विद्यार्थिनीशी अखेर लग्न केलं.

हीर रांझा, रोमियो ज्युलियट, लैला मजनू अशा किती तरी प्रेमवेड्यांनी समाजाचा विरोध पत्करुन प्रेमालाच मान्यता दिल्याचं भूतकाळात सांगितलं गेलंय. शेवटी प्रेम हे एकतर्फी न होता दोघांचीही त्या प्रेमाला मान्यता असावी लागते. शेवटी ‘प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे लेणे’ हे काही खोटं नाही.

एकीकडे प्रेमाचा स्विकार न करणार्‍या मुलीचा जीवंत जाळण्याचे, तिचे नको त्या अवस्थेतले फोटो सोशल मिडियावर टाकण्याचे प्रकार वाढत असताना आणि एकतर्फी प्रेमातून मुलींचे बळी घेण्याचं प्रमाण वाढत असताना आपल्यापेक्षा वयानं 32 वर्षे मोठे असलेल्या शिक्षकाबरोबर लग्न करण्याचा झोया नूरचा हा निर्णय म्हणजे स्वतंत्र विचाराचं एक उदाहरण आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :